RBI ने ICICI बँकेला तीन कोटींचा दंड ठोठावला, जाणून घ्या ‘कारण’

1 जुलै 2015 रोजी बँकांकडून जारी केलेल्या 'वर्गीकरण मूल्यमापन आणि गुंतवणूक पोर्टफोलिओ' च्या काही निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीआयसीआय बँकेला 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. Reserve Bank Of India Icici Bank

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:51 PM, 3 May 2021
RBI ने ICICI बँकेला तीन कोटींचा दंड ठोठावला, जाणून घ्या 'कारण'
Icici Bank

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसी बँकेनं (ICICI Bank) काही निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 1 जुलै 2015 रोजी बँकांकडून जारी केलेल्या ‘वर्गीकरण मूल्यमापन आणि गुंतवणूक पोर्टफोलिओ’ च्या काही निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीआयसीआय बँकेला 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. (Reserve Bank Of India Imposes 3 Crore Penalty On Icici Bank)

बँकेच्या ग्राहकांशी कोणत्याही व्यवहारावर याचा परिणाम नाही

नियामक टप्प्यातील त्रुटींमुळे हे पाऊल उचलण्यात आले असून, बँकेच्या ग्राहकांशी कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या मान्यतेचा निर्णयावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे की, सिक्युरिटीज एका कॅटेगरीतून दुसर्‍या प्रकारात बदलल्या गेल्या असून, या प्रक्रियेत केंद्रीय बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

नियमांचे पालन करण्यात चूक केल्याबद्दल त्यांच्यावर दंड का लावला जाऊ नये?

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. नियमांचे पालन करण्यात चूक केल्याबद्दल त्यांच्यावर दंड का लावला जाऊ नये, याचे कारण नोटिशीच्या माध्यमातून विचारण्यात आले होते. नोटिशीच्या उत्तरात बँकेचे स्पष्टीकरण दिलंय. त्यानंतर आरबीआयच्या वैयक्तिक सुनावणीला त्यांनी तोंडी प्रतिक्रिया दिल्यानंतर रिझर्व्ह बँक कारवाईच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलीय. आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याचा बँकेवर करण्यात आलेला आरोप खरा आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा ठपकाही आरबीआयनं ठेवलाय.

एकापेक्षा जास्त बँकेत खाती आहेत, मग हे जाणून घ्या…

जर आपण एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती उघडलेली असल्यास काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर त्या समजून घेतल्या नाही तर आपले नुकसान होऊ शकते. बर्‍याचदा नवीन ऑफर्स आणि अधिक व्याजांच्या आमिषानं लोक त्वरित नवीन खाते उघडतात. यानंतर लोक अनेकदा त्यांचे जुने बँक खाते विसरून जातात. तसेच अशा खात्यांमध्ये कोणताही व्यवहार न झाल्यानं ती खाती निष्क्रिय होतात. परंतु या निष्क्रिय खात्यांच्या माध्यमातूनही आपली मोठी फसवणूकही होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्याकडेही बँक खाते असल्यास नक्कीच या गोष्टी जाणून घ्या. आपल्या बँक खात्यात तीन महिन्यांपर्यंत पगार क्रेडिट नसल्यास ते खाते बचत खात्यात बदलते. बचत खात्यात बदल झाल्यावर बँकेचे नवीन नियम लागू होतात. अशा परिस्थितीत आपल्याला बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. जर आपण ही देखभाल फी न भरल्यास आपल्याला दंड भरावा लागू शकतो आणि बँक आपल्या खात्यात जमा केलेल्या रकमेमधून पैसे कमी करू शकते.

संबंधित बातम्या

रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर नेमके कोण?; कार्यकाळ किती असणार?

परदेशातून येणाऱ्या मदतीवर आता IGST नाही; कोरोना काळात मोदी सरकारचा मोठा दिलासा

Reserve Bank Of India Imposes 3 Crore Penalty On Icici Bank