बँकिंगशी संबंधित हा नियम दोन दिवसांनंतर बदलणार, होणार जबरदस्त फायदा

रिझर्व्ह बँकेने (RBI) RTGS 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. RTGS Service Will Be Changed From 1 December 2020

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:18 AM, 29 Nov 2020
बँकिंगशी संबंधित हा नियम दोन दिवसांनंतर बदलणार, होणार जबरदस्त फायदा

नवी दिल्लीः पुढील महिन्यापासून देशात बँकिंगशी संबंधित नियमात बदल होणार आहे. खरंतर पुढच्या महिन्यापासून रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा 24 तास आणि सात दिवस उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ग्राहक RTGS द्वारे वर्षाच्या 365 दिवसांतून कधीही पैशांचा व्यवहार करू शकतील. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर महिन्यात RTGS 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. (RTGS Service Will Be Changed From 1 December 2020)

RBI चे म्हणणे आहे की, ही सुविधा सुरू झाल्यावर भारत जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक होईल ज्यांच्याकडे 24x7x365 मोठ्या मूल्याची रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. आता महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी आरटीजीएस सिस्टम सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध असेल.

RTGS सेवा म्हणजे काय?

RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर त्वरित करता येतात. मोठ्या व्यवहारामध्ये याचा वापर केला जातो. RTGS द्वारे दोन लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम एकाच वेळी ट्रान्सफर करता येणार नाही. त्याच वेळी वेगवेगळ्या बँकांमध्ये जास्तीत जास्त पैसे टान्सफर करण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. ऑनलाइन आणि बँक शाखांमधूनही या सुविधेचा वापर करता येतो. RTGS Service Will Be Changed From 1 December 2020

NEFT ने आधीच आपले नियम बदलले

NEFT चा नियम आधीच बदलला गेला आहे. डिसेंबर 2019 मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) संबंधित नियम बदलण्यात आले आहेत. मागील वर्षापासून हे 24x7x365 दिवस ग्राहकांसाठी देखील उपलब्ध आहे. NEFT मार्फत हस्तांतरित केलेल्या निधीसाठी कोणतीही किमान मर्यादा नाही, तर जास्तीत जास्त पैसे टान्सफर करण्याची मर्यादा एका बँकेतून दुसर्‍या बँकेत वेगवेगळी असू शकते. यासाठी काही बँकांमध्ये कमाल मर्यादा नाही. एनईएफटीचा उपयोग ऑनलाईन आणि बँक शाखेच्या माध्यमातूनही केला जाऊ शकतो.

पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून (December) देशात बँकिंगशी संबंधित नियम बदलणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एटीएममधून (ATM) पैसे काढणं आणखी सोपं व्हावं, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून यासंबंधी काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात. अधिक माहितीनुसार बँका 1 डिसेंबरपासून ओटीपी (One Time Password) च्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे.

(RTGS Service Will Be Changed From 1 December 2020)

इतर बातम्या – 

सरकारकडून अलर्ट! WhatsApp वर आलेल्या ‘या’ लिंकमुळे होऊ शकते फसवणूक

डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार, कॅश काढताना द्यावी लागणार ‘ही’ माहिती