नवी दिल्लीः भारतीय टपाल कार्यालयाने (India Post) पोस्ट ऑफिसमधील (Post Office) बचत खातेदारांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केलीय. इंडिया पोस्ट, पोस्ट ऑफिस जीडीएस (Gramin Dak Seva) शाखेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आलीय. प्रति व्यक्ती पैसे काढण्याची मर्यादा 5 हजार रुपयांवरून वाढविलीय. अशा वेळी जेव्हा सर्व बँका बचत खात्याचे व्याजदर कमी करत आहेत, तेव्हा पोस्ट ऑफिस बचत खात्याचे व्याजदर वार्षिक 4 टक्के आहे. जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये खातेही उघडले असेल तर नियमात काय बदल झाले आहेत ते समजून घ्या. (Rules have changed for cash deposits and withdrawals in PPF, post office savings account)
इंडिया पोस्टाने घोषित केले आहे की, ते पोस्ट ऑफिस जीडीएस (Gramin Dak Seva) शाखेत पैसे काढण्याची मर्यादा वाढविली आहे. आता ही मर्यादा 5000 रुपयांवरून 20,000 रुपयांपर्यंत करण्यात आलीय. वेळोवेळी पोस्ट ऑफिसमधील ठेवी वाढविण्याचा उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय.
>> कोणतीही शाखा पोस्टमास्ट (BPM) एका खात्यात एका दिवसात 50,000 पेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारणार नाही. त्याशिवाय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), मासिक उत्पन्न योजना (MIS), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) योजना RICT CBS App मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, या खात्यांमधील ठेवी विड्रॉल फॉर्मद्वारे किंवा केवळ चेकद्वारे स्वीकारल्या जातील.
>> कोणत्याही सीबीएस पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या सर्व PosB धनादेश, कोणत्याही कोअर बँकिंग सक्षम (CBS) पोस्ट ऑफिसमध्ये सादर केल्यास, त्यांना क्रॉस चेक समजले जाईल आणि क्लिअरिंगसाठी पाठविले जाणार नाही.
>> एका दिवसात अन्य SOLs च्या एका खात्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार करण्यास परवानगी नाही.
>> पोस्ट ऑफिस बचत खात्यात 500 किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे आणि जर खात्यात किमान शिल्लक ठेवली गेली नाही तर खाते देखभाल फी म्हणून 100 रुपये वजा केले जातील.
संबंधित बातम्या
स्टेट बँकेने आणली खूप पैसे कमवायची सुवर्णसंधी, डिमॅट खाते उघडून वाचवा 1350 रुपये
जेनेरिक मेडिकल सुरु कराल तर होईल लाखोंची कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Rules have changed for cash deposits and withdrawals in PPF, post office savings account