SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! चुकून इंटरनेटवर शोधू नका ‘हा’ नंबर अन्यथा खात्यातून पैसे गायब

इंटरनेटवर टोल फ्री नंबर तपासणे आपल्यासाठी खूपच धोक्याचे आहे, असंही एसबीआयनं ग्राहकांना सांगितलंय. इंटरनेटवर टोल फ्री क्रमांक किंवा ग्राहक सेवा क्रमांक शोधू नका, असंही त्या मेसेजमध्ये म्हटलंय. SBI alerts 40 crore customers

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:57 PM, 16 Apr 2021
SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! चुकून इंटरनेटवर शोधू नका 'हा' नंबर अन्यथा खात्यातून पैसे गायब
SBI 44 crore customers

नवी दिल्लीः इंटरनेटवर टोल फ्री नंबर (Toll Free Number) शोधणे धोकादायक ठरू शकते, अशी सूचना SBI ने आपल्या ग्राहकांना दिलीय. एसबीआय कार्डने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. इंटरनेटवर टोल फ्री नंबर तपासणे आपल्यासाठी खूपच धोक्याचे आहे, असंही एसबीआयनं ग्राहकांना सांगितलंय. इंटरनेटवर टोल फ्री क्रमांक किंवा ग्राहक सेवा क्रमांक शोधू नका, असंही त्या मेसेजमध्ये म्हटलंय. तसेच एसबीआय कार्डने वापरकर्त्यांना अधिक माहिती दिलीय, त्यानुसार वापरकर्त्यांनी इंटरनेट वापरावे. (SBI Alerts 40 Crore Customers! Do Not Accidentally Search The Internet For ‘This’ Number Otherwise Money Will Disappear From The Account)

टोल फ्री नंबर शोधणे धोकादायक ठरू शकते

एसबीआयने ग्राहकांसाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, टोल फ्री नंबर शोधणे धोकादायक ठरू शकते. जेव्हा जेव्हा आपल्याला बँक किंवा कोणत्याही कामासाठी ग्राहक सेवा आवश्यक असेल, तेव्हा आपण थेट इंटरनेटवर टोल फ्री किंवा ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध सुरू करता. इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर कॉल करून ते त्यांच्या समस्या सांगतात, ज्यामुळे आपली समस्या आणखी वाढू शकते. याबद्दल बँकेचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊयात.

SBI चा इशारा काय?

एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी कधीही सर्च इंजिनचा वापर करू नका. यासाठी क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत अॅप्लिकेशनवर नेहमी जा आणि तेथून नंबर मिळवा. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपण ग्राहक सेवेसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करावा किंवा आपल्या क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या नंबरवर फक्त कॉल करा. ‘

ओटीपी, सीव्हीव्ही, पिन यांसारखी वैयक्तिक माहिती देऊ नका

तसेच एसबीआय कार्ड म्हणतो, ‘ओटीपी, सीव्हीव्ही, पिन यांसारखी वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. तसेच एसबीआय कार्ड प्रतिनिधी कधीही अशी माहिती विचारत नाहीत. कोणताही टोल फ्री नंबर किंवा ग्राहक सेवा नंबर फोन नंबरसारखे नसतात. ते नेहमीच 1800-, 1888-, 1844- इत्यादीपासून पासून सुरू होतात. ‘यात आपण इंटरनेटवर टोल फ्री नंबर शोधण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे आणि टोल फ्री क्रमांक माहीत नसल्यास अधिकृत वेबसाईटची मदत घ्या.

फसवणूक कशी टाळावी?

आजकाल काही हॅकर्स सर्वात जास्त शोधलेल्या कीवर्डवर टोल फ्री नंबर रँक करतात. अशा परिस्थितीत समजा तुमच्याकडे एसबीआयच्या ग्राहक सेवेत काही काम आहे आणि ते इंटरनेटवर शोधून काढत असाल तर सर्चमध्ये तुम्हाला एक टोल फ्री नंबर दिसतो, जो चुकीचा असू शकतो. जेव्हा आपण या क्रमांकावर कॉल करता तेव्हा आपली बरीच वैयक्तिक माहिती संबंधितांना मिळते आणि त्यानंतर आपले खातेही रिकामे होऊ शकते. SBI Alerts 40 Crore Customers! Do Not Accidentally Search The Internet For ‘This’ Number Otherwise Money Will Disappear From The Account

संबंधित बातम्या

PPF गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; व्याजदर वाढवणे आणि मॅच्युरिटी कालावधी घटवण्याच्या सूचना

देशात लवकरच 8 नव्या बँका, RBI कडे अर्ज, व्यवहारासाठी तुमच्याकडे आता मोठे पर्याय उपलब्ध

SBI Alerts 40 Crore Customers! Do Not Accidentally Search The Internet For ‘This’ Number Otherwise Money Will Disappear From The Account