निवृत्ती वेतनधारकांसाठी SBI Pension Loan आहे खास; जाणून घ्या व्याजदरासह सर्वकाही

एसबीआय निवृत्तीवेतन कर्जाच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक (SBI Pension Loan) घर खरेदी करणे, फिरणे, मुलांच्या लग्नाचा खर्च आणि आरोग्य खर्च यासारख्या गरजा भागवू शकतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:31 AM, 24 Feb 2021
निवृत्ती वेतनधारकांसाठी SBI Pension Loan आहे खास; जाणून घ्या व्याजदरासह सर्वकाही
SBI Pension Loan is special for retirees

नवी दिल्ली: सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन मिळते, जे त्यांच्या वृद्धापकाळात खर्चासाठी पुरेसे असू शकते. परंतु मोठ्या गरजा भागविण्यासाठी ते पैसे अपुरे असल्याचे बऱ्याचदा सिद्ध झालंय. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) केंद्र किंवा राज्य सरकारकडून निवृत्तीवेतनधारक (Pensioners) आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन कर्ज सुविधा (Family Pensioners) सुरू केलीय. एसबीआय निवृत्तीवेतन कर्जाच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक (SBI Pension Loan) घर खरेदी करणे, फिरणे, मुलांच्या लग्नाचा खर्च आणि आरोग्य खर्च यासारख्या गरजा भागवू शकतात. (SBI Pension Loan is special for retirees; Know everything, including interest rates)

एसबीआय पेन्शन कर्जासाठी कमी प्रोसेसिंग फी भरावी लागेल

>>एसबीआयने ट्विट केले आहे की, आपणास निवृत्तीवेतन कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण टोल फ्री क्रमांक 1800-11-2211 वर डायल करू शकता.
>> आपण बॅंकेच्या संपर्क केंद्रावरून 7208933142 वर मिस्ड कॉल करू शकता किंवा ‘PERSONAL’ टाइप करून 7208933145 वर एसएमएस पाठवू शकता.
>> ज्येष्ठ नागरिकांना कर्जासाठी कमी प्रक्रिया शुल्क भरावे लागते. इतकेच नाही तर कर्ज घेण्याची प्रक्रियाही अतिशय वेगवान आहे.
>> सोपा ईएमआय पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचवेळी किमान कागदपत्रे सादर करावी लागतात. यासाठी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येतो.

एसबीआय पेन्शन कर्जासाठी कोण अर्ज करू शकतो?

एसबीआय पेन्शन कर्जासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक अर्ज करू शकतात. यासाठी निवृत्तीवेतन धारकांचे वय 76 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयकडे असले पाहिजे. निवृत्तीवेतन धारकाने असे वचन दिले पाहिजे की, तो कर्जाच्या कालावधीत ट्रेझरीला दिलेले अधिकार बदलणार नाही. त्याअंतर्गत सैन्य, नौदल, हवाई दल, निमलष्करी दले (सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ आयटीबीपी), तटरक्षक दल, राष्ट्रीय रायफल्स आणि आसाम रायफल्ससह सशस्त्र दलाचे निवृत्तीवेतनधारक अर्ज करू शकतात. यातही पेन्शन पेमेंट ऑर्डर फक्त एसबीआयकडेच असावी. किमान वयोमर्यादा नाही. कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे जास्तीत जास्त वय 76 वर्षे आहे. कौटुंबिक पेन्शनमध्ये निवृत्तीवेतनाधारकांच्या निधनानंतर कुटुंबातील अधिकृत सदस्य पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.

पेन्शन कर्जावरील व्याजदर आणि आवश्यक कागदपत्रे काय असतील?

>> स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना वर्षाकाठी 9.75% व्याजदराने एसबीआय पेन्शन कर्ज प्रदान करीत आहे.
>> अर्ज करताना पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड ओळखपत्र म्हणून ठेवावे लागतील.
>> अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्ड, बँक अकाऊंट स्टेटमेंट, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वीजबिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी प्रिस्क्रिप्शन अॅग्रीमेंट किंवा आधार कार्ड ठेवता येईल. उत्पन्नाचा पुरावा म्हणून पेन्शन पेमेंट ऑर्डर असावी.

संबंधित बातम्या

FD Rates In India: 2 कोटींपेक्षा कमी FD: SBI, PNB सह 5 मोठ्या बँकांमध्ये व्याजदर काय?

एलआयसीची नवीन बिमा ज्योती पॉलिसी, फिक्स्ड इनकमव्यतिरिक्त 20 वर्षे चालू राहील परतावा

SBI Pension Loan is special for retirees; Know everything, including interest rates