20 दिवसांनंतर सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांना 3.30 लाख कोटींचं नुकसान

ईटीच्या वृत्तानुसार, आज गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी रुपये बुडाले.

20 दिवसांनंतर सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांना 3.30 लाख कोटींचं नुकसान

मुंबईः तब्बल 20 दिवसांनंतर आज शेअर बाजारात मोठ्या घसरणीची नोंद झाली आहे. 41 हजारांच्या दिशेने वाढणारा सेन्सेक्स 39700च्या पातळीवर आला आहे. निफ्टीसुद्धा 11660च्या पातळीवर पोहोचला. तो जवळजवळ 300 अंकांनी गडगडला. सेन्सेक्स 1066 अंकांनी कोसळून 39728वर, तर निफ्टी 290 अंकांची घसरण नोंदवत 11680वर बंद झाला.(sensex down more than 1100 points)

ईटीच्या वृत्तानुसार, आज गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी रुपये बुडाले. BSE(bombay stock exchange) लिस्टेड कंपन्यांचं बाजारातील भागभांडवल घटून 157.22 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचा मोठा तोटा बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँक यांना झाला. त्यांच्या शेअर्समध्ये 4 टक्के आणि त्यापेक्षा जास्त टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

अमेरिका लवकरच आणखी एक मदतीसाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ती शक्यताही आता धूसर झाली आहे, त्यामुळेच बाजारात नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. तसेच अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा एकदा चर्चेत असून, त्याचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. चीनच्या अलिबाबाला काळ्या यादीत टाकण्याचा एक प्रस्ताव अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिला आहे. अलिबाबा सध्या बाजारात आयपीओ आणण्याच्या विचारात आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून शेअर बाजारामध्ये सतत वाढ झाली होती. 29 सप्टेंबरचा अपवाद वगळता सेन्सेक्स 25 सप्टेंबरपासून स्थिररीत्या बंद होत होता. 24 सप्टेंबरला सेन्सेक्स 36,553च्या पातळीवर बंद झाला. 14 ऑक्टोबरला 40,794च्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन आठवड्यांत तो 4200 अंकांच्या उच्चांकी स्तरानं वाढला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

सेन्सेक्सची इतिहासातील सर्वात मोठी घसरण, कोरोनाचा मुंबई शेअर बाजारात कहर

Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ

(sensex down more than 1100 points)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *