ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात जोरदार प्रगतीची चिन्हे; जाणून घ्या कधी परतणार तेजीचे चित्र

फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीने (एफआयएटीएच) म्हटले आहे की, 2020-21 हे आर्थिक वर्ष उद्योगासाठी सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. (Signs of strong progress in the field of travel and tourism; Find out when the bullish picture will return)

ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात जोरदार प्रगतीची चिन्हे; जाणून घ्या कधी परतणार तेजीचे चित्र
ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात जोरदार प्रगतीची चिन्हे
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 9:05 PM

नवी दिल्ली : भारत नेहमीच आपल्या समृद्ध परंपरा आणि प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित सर्व स्मारके पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. भौगोलिक विविधताही या देशाला पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवते. गेल्या वर्षांपासून संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोना महामारीचा देशातील पर्यटन व आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध असल्यामुळे देशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. परिणामी पर्यटनाशी संबंधित असलेल्या व्यवसायांवर फार मोठा परिणाम दिसून येत आहे. पर्यटन क्षेत्राचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. (Signs of strong progress in the field of travel and tourism; know when the bullish picture will return)

एफआयएटीएचने व्यक्त केली आशा

फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीने (एफआयएटीएच) म्हटले आहे की, 2020-21 हे आर्थिक वर्ष उद्योगासाठी सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. देशात यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले. यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. आता कुठे दुसरी लाट ओसरू लागली आहे. ही लाट पूर्णपणे हद्दपार झाल्यानंतर देशातील पर्यटन उद्योगात हळूहळू सुधारणा होण्याची आशा वाटू लागली आहे. त्यानंतरच पर्यटन क्षेत्राशी संबंधित हॉस्पिटॅलिटी, रेस्ट हाऊस आणि टुरिझम यासारख्या व्यवसायांमध्ये भरभराट येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

लसीकरणामुळे परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता

आता लोकांमध्ये अशी आशा आहे की देशात कोरोना लसीकरणाची मोहीम जसजशी वेगवान होईल, तसतसे लोक बाहेर फिरायला जातील आणि त्यामुळे पुन्हा पर्यटनाची आधीसारखी परिस्थिती दिसून येईल. या परिस्थितीत आयआरसीटीसी, इंडियोगो या प्रवासी उद्योगाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढू होऊ शकते. यासह लेजर व्यवसायाशी संबंधित शेअर्समध्येही वाढ होऊ शकते. जाणकारांचे म्हणणे आहे की महिंद्रा हॉलिडेज, इंडियन हॉटेल्स, लेमन ट्री आणि ईआयएच यांच्या शेअर्सचे मूल्यांकन वाढू शकेल.

ट्रॅव्हल पॅकेजेस प्रदान करणाऱ्या कंपन्यांनाही होईल फायदा

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या शेअर्सचा तांत्रिक चार्ट खूप चांगला दिसत आहे. ट्रॅव्हल टुरिझम आणि विश्रांतीविषयक घडामोडींमध्ये वाढ झाल्यानंतर ट्रॅव्हल पॅकेजेस प्रदान करणार्‍या कंपन्यादेखील चांगला फायदा घेऊ शकतील. या पार्श्वभूमीवर 59,000 नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट्सची नेटवर्क असलेल्या एसेमीमेट्रिप या आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी नजर ठेवून राहायला पाहिजे. गुंतवणूकदारांसाठी हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असणार आहे. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की येत्या तिमाहीत आपल्याला एसेमीमीट्रिपमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. एकूणच काय तर देशातून कोरोनाचा दुसरी लाट संपल्यानंतर पर्यटन उद्योग क्षेत्रात पुन्हा चांगले चित्र दिसण्याची आशा आहे. (Signs of strong progress in the field of travel and tourism; know when the bullish picture will return)

इतर बातम्या

माझा मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा, फक्त कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ते द्या : छगन भुजबळ

आयडीबीआय बँकेचे केवायसी अपडेट करणे झाले आणखी सोपे; जाणून घ्या नेमकी काय आहे प्रक्रिया

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.