Gold Rate Today: 8 महिन्यांत सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त; झटपट वाचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव; वाचा सविस्तर

पण आता सोने (Gold Rate Today) जवळपास सर्वोच्च स्तरापासून आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. Gold Rate Today)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:39 PM, 7 Mar 2021
Gold Rate Today: 8 महिन्यांत सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त; झटपट वाचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव; वाचा सविस्तर
gold rate today

नवी दिल्ली: संपूर्ण जगात आणि विशेषत: भारतामध्ये सोन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कठीण काळात संसाराचा गाडा हाकण्यासाठी सोने बऱ्याचदा फायदेशीर ठरते. कोरोना संकटाच्या काळातही सोन्यानं अनेक कुटुंबांना आधार दिला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरला आणि अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली. 2020 दरम्यान सोन्याने गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला. ऑगस्ट 2020 रोजी प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, पण आता सोने (Gold Rate Today) जवळपास सर्वोच्च स्तरापासून आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. (Special Report: Gold Rate Today Gold silver cheaper by Rs 13,000 in 8 months; Instant Read 10 gram gold price)

सोने आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त

शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी सोन्याची किंमत 7 ऑगस्ट 2020 पासूनच्या सर्वोच्च पातळीवरून 13,121 रुपयांनी घसरली असून, आता सोने प्रतितोळा 43,887 रुपयांवर आलेय. 7 ऑगस्ट 2020 ला चांदी 77,840 रुपये प्रतिकिलो होती, जी गेल्या शुक्रवारी 13,035 रुपयांनी घसरून 64,805 रुपये झाली. दरम्यान, दररोज सोन्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी की दुसऱ्या कशात याचा विचारात गुंतवणूकदार आहेत. त्याच वेळी काही गुंतवणूकदार आपल्याकडे असलेले सोने विक्री करण्याचे किंवा ठेवण्याबद्दल संभ्रमित आहेत. येत्या काळात सोन्याचा ट्रेंड काय असू शकतो?

यावर्षी सोने 63 हजार रुपयांच्या पातळीवर जाईल

तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ही परिस्थिती जास्त काळ राहील, असे त्यांना वाटत नाही. जगातील बर्‍याच शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारही वाढलाय. परंतु बाजारात चढउतारही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट्स जसजसा अधिक वाढत जातोय, तसतसे नफ्यातही जोखीम देखील वाढतेय. अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नंतर सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या सोन्याकडे वळतील. तसेच सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि ते पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असा अंदाज आहे की, जर सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63,000 रुपयांच्या पातळीवर जाईल.

सध्याच्या किमतीवर आपल्याला दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळू शकेल

गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग देखील संभ्रमात आहे. त्यांना सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करणे सुरक्षित आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे. सोन्यात दीर्घ मुदतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकताो? यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किमती सध्या घसरल्याची अनेक कारणे आहेत. यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना लसीच्या लसीकरण मोहिमेतील भरभराट, नवीन लसींबद्दलची चांगली बातमी आणि आर्थिक हालचालीतील वाढ आहे. सोन्याच्या किमतींवरही त्याचा परिणाम होत आहे आणि इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने सोने स्वस्त झाले. जर डॉलरची मागणी वाढत गेली तर सोन्याच्या किमतीवर दबाव येईल.

गुंतवणूकदार अधिक धोकादायक पर्यायांकडे वळतायत

कोरोना लसीकरण वाढल्यामुळे आर्थिक हालचालींना वेग आलाय. अशा परिस्थितीत लोक अधिक जोखमीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. यामध्ये इक्विटी आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. त्याच वेळी सोन्याच्या किमतीतील घसरण तात्पुरती आणि अल्पकालीन आहे. म्हणूनच सध्याच्या किमतींवर सोन्याची गुंतवणूक करून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत उत्कृष्ट नफा कमावू शकतात. याउलट इक्विटी तेजीत टिकण्यास फारसा वाव नाही. तर नफा कमावून लवकरच बाहेर पडणे हा एक चांगला पर्याय असू शकेल. तज्ज्ञांच्या मते, सोने जून 2021 पर्यंत प्रति औंस 1960 डॉलरला पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

सोने आणि चांदी 1217 रुपयांनी स्वस्त; झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Special Report: Gold Rate Today Gold silver cheaper by Rs 13,000 in 8 months; Instant Read 10 gram gold price