नवी दिल्लीः सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) नेहमीच फायदेशीर ठरत असते. बऱ्याचदा वैवाहिक जीवनातही संसाराचा गाडा हाकण्यासाठी सोन्याची मदत होत असते. सोने तारण ठेवून बऱ्याचदा गरजा भागवल्या जातात. कोरोना सारख्या कठीण काळातही सोन्यानं अनेक कुटुंबांना आधार दिलेला आहे. त्यामुळेच गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सोन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळालेत. तरीही ग्राहकांचा अजूनही सोने खरेदीकडे कल आहे. विशेष म्हणजे सोन्याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहोत. सोन्याची दशमान पद्धत कशी ठरली, 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोनेच कसे प्रमाण मानावे लागले, यासंदर्भात इत्थंभूत माहिती देत आहोत. (Precursors Of Vaccination Why Invest In Gold?)
सोन्यातील गुंतवणूक अजिबात फायदेशीर नसल्याचंही काही अर्थतज्ज्ञांच्या मत आहे. कारण सोन्याचे भाव वाढले तरीसुद्धा आपण सराफा दुकानात सोने विकायला काही जात नाही. त्यामुळेच कागदोपत्री सोन्याचे भाव वाढले तरी त्याचा काहीही उपयोग नाही, तसेच घेतलेलं सोनं विकायला गेल्यानंतरही सोनार त्यात काही ना काही घट काढतोच, त्यामुळे सोन्याचे वाढलेले भाव किती फायदेशीर हा एक प्रश्नच आहे.
100 वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. 1 तोळा सोनं हे 10 ग्रॅमच्या दशमान पद्धतीत बसवणं सहजसोपं जातं. त्यामुळे 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं ही पद्धत निश्चित केली गेली.
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bonds) ची दहावी मालिकेंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करण्याची संधी होती. परंतु ती मुदत आता संपलेली आहे. तसेच यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख 19 जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,104 रुपये ठेवली आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदारानं यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,054 रुपये असेल.
संबंधित बातम्या
Gold/Silver Rate Today: तीन दिवसांत दोनदा सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price Today | मकरसंक्रांतीला सोन्याचे दर घसरले, तुमच्या शहरातील आजचे भाव जाणून घ्या
Precursors Of Vaccination Why Invest In Gold?