‘जावा बाईक’सोबत तुमचा बिझनेस सुरु करा, 15 तारखेपर्यंतच संधी

'जावा बाईक'सोबत तुमचा बिझनेस सुरु करा, 15 तारखेपर्यंतच संधी

मुंबई : ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या ‘क्लासिक लिजंड्स’ कंपनीने जवळपास दोन दशकांनंतर लॉन्च केलेल्या जावा बाईकचं नाव सध्या बाईकप्रेमींमध्ये चर्चेत आहे. या बाईकला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळे जावा बाईकचे भारतभर 100 डीलरशिप स्टोअर उघडण्याच्या तयारीत कंपनी आहे. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत 100 डिलरशीप उघडण्याचं ध्येय कंपनीने ठेवले असून, आतापर्यंत केवळ 10 […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या ‘क्लासिक लिजंड्स’ कंपनीने जवळपास दोन दशकांनंतर लॉन्च केलेल्या जावा बाईकचं नाव सध्या बाईकप्रेमींमध्ये चर्चेत आहे. या बाईकला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळे जावा बाईकचे भारतभर 100 डीलरशिप स्टोअर उघडण्याच्या तयारीत कंपनी आहे. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत 100 डिलरशीप उघडण्याचं ध्येय कंपनीने ठेवले असून, आतापर्यंत केवळ 10 डिलरशीप उघडले आहेत. त्यामुळे जावा बाईकसोबत काम करण्याची तुम्हाला नामी संधी आहे.

100 डिलरशीप सुरु होणार

क्लसिक लिजंड्स कंपनीने जावा बाईकचे देशभर 100 डिलरशीप उघडण्याची घोषणा केली. 15 फेब्रुवारीपर्यंत हे डिलरशिप उघडले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. क्लासिक लिजंड प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक अनुपम थरेजा यांच्या माहितीनुसार, जावा बाईक आता रिटेल एक्सपिरियन्सवरही लक्ष केंद्रीत करणार आहे. 15 फेब्रुवारी 2019 च्या आधी देशभरात 100 हून अधिक डिलरशीप कंपनी सुरु करेल. जावा बाईकचे आतापर्यंत दिल्लीमध्ये 5, पुण्यात 2 आणि औरंगाबादमध्ये 3 डिलरशीप सुरु करण्यात आले आहेत.

डिलरशिपचे वैशिष्ट्य काय?

क्लासिक लिजंड्स कंपनीच्या नेटवर्क स्ट्रॅटेजीच्या दाव्यानुसार, जावा बाईकसाठी ज्या वेगाने आणि संख्येने बुकिंग सुरु झाली आहे, ते पाहता भारतात डिलरशीप वाढवाव्या लागणार आहेत. डिलरशिपचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असे की, प्रत्येक डिलरशीपकडे टेस्ट ड्राईव्हची सुविधा असेल.

जावा बाईकसाठी सप्टेंबर 2019 पर्यंत बुकिंग पूर्ण झाल्याने 25 डिसेंबरलाच ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. मात्र, डीलर्सच्या माध्यमातून बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे,

डिलरशीप मिळवण्यासाठी अर्ज कसे कराल?

तुम्हाला क्लासिक लिजंड्स कंपनीसोबत बिझनेस करायचा असेल आणि जावा बाईकचे डीलर व्हायचे असेल, तर जावा बाईकच्या https://www.jawamotorcycles.com/dealer/becomeadealer या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म दिसेल, तो फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर कंपनीचे अधिकारी तुम्हाला संपर्क करतील.

असे बना ‘जावा बाईक’चे डीलर

  • https://www.jawamotorcycles.com/dealer/becomeadealer या वेबसाईटवर जा
  • तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल, त्यानंतर वैयक्तिक माहितीही द्यावी लागेल.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म येईल.
  • वैयक्तिक माहितीत तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर, डिलरशीपचं नाव, पत्त, शहराचं नाव, राज्याचं नाव, आधार किंवा इतर ओळखपत्र इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • या सगळ्या माहितीनंतर जावा बाईकचे अधिकारी तुम्हाला संपर्क करतील.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें