एक्झिट पोलनंतर सेन्सेक्सची मुसंडी, 10 वर्षांचा विक्रम मोडला

मुंबई : एक्झिट पोलनुसार भाजपची सत्ता येताना दिसताच शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजारातील (Bombay Stock Exchange) 30 शेअर्सने उसळी घेत 10 वर्षांचा विक्रम मोडलाय. एका दिवसाच्या कामकाजात सेन्सेक्सने 1421.90 ने (3.75%) मजबूत होण्याचा विक्रम 10 वर्षात पहिल्यांदाच झालाय. तर Nation Stock Exchange (NSE) चे 50 शेअर्स 421.10 अंक (3.69%) ने मजबूत झाले …

एक्झिट पोलनंतर सेन्सेक्सची मुसंडी, 10 वर्षांचा विक्रम मोडला

मुंबई : एक्झिट पोलनुसार भाजपची सत्ता येताना दिसताच शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजारातील (Bombay Stock Exchange) 30 शेअर्सने उसळी घेत 10 वर्षांचा विक्रम मोडलाय. एका दिवसाच्या कामकाजात सेन्सेक्सने 1421.90 ने (3.75%) मजबूत होण्याचा विक्रम 10 वर्षात पहिल्यांदाच झालाय. तर Nation Stock Exchange (NSE) चे 50 शेअर्स 421.10 अंक (3.69%) ने मजबूत झाले आहेत. शेअर मार्केट अनुक्रमे 39,352.67 आणि 11,828.25 अंकांवर बंद झालं.

ज्या शेअर्सने उसळी घेतली, त्यामध्ये इंडसइंड बँक (8.64%), एसबीआय (8.04%), टाटा मोटर्स (7.53%), टाटा मोटर्स डीवीआर (6.86%), यस बँक (6.73%) टॉप 5 शेअर्समध्ये आहेत. तर अदानी पोर्ट्स (10.99%), इंडियाबुल्स हाउसिंग फाइनन्स (10.62%), इंडसइंड बँक (8.77%), एसबीआय (8.32%) आणि टाटा मोटर्स (7.5%) यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे. यापूर्वी सोमवारी सकाळी सेन्सेक्स 946.24 अंक आणि एनएसईच्या निफ्टीमध्ये 244.75 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती.

बीएसईने जवळपास 40 कंपन्यांच्या शेअर्सने गेल्या 52 आठवड्यातील सर्वाच्च स्तराची उसळी गाठली आहे. यामध्ये बजाज फायनन्स, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसआरएफ, टायटन, कोटक महिंद्रा बँक, पीव्हीआर यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटरचा एक्झिट पोल

‘टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर’ यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे. देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज  Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *