आई-वडिलांच्या सेवेसाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथाडलं, आता प्रख्यात विमा कंपनीचा मालक

आपल्या आयुष्यात आई-वडिलांचं योगदान खूप मोठं असतं. त्यांच्या मेहनत आणि संस्कारामुळेच आपलं शिक्षण होतं (story of Vidal Health company mananging director Girish Rao).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:18 PM, 3 May 2021
आई-वडिलांच्या सेवेसाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथाडलं, आता प्रख्यात विमा कंपनीचा मालक
गिरीश राव

मुंबई : आपल्या आयुष्यात आई-वडिलांचं योगदान खूप मोठं असतं. त्यांच्या मेहनत आणि संस्कारामुळेच आपलं शिक्षण होतं. आपल्या आई-वडिलांच्या मदतीमुळेच आपण चांगल्या पदावर नोकरीवर लागतो. त्यामुळे ज्यावेळी त्यांना आधाराची गरज वाटते त्यावेळी त्यांच्यासोबत राहणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. याच कर्तव्याची जाणीव ठेवून पेशाने मॅकेनिकल इंजेनिअर असलेल्या गिरीश राव यांनी चांगल्या पदावरील चांगल्या नोकरीला लाथ मारत भारतात आपलं नवं करियर घडवलं. आई-वडिलांची सेवा केल्याचा त्यांना फायदाही झालाच म्हणा. ते आज देशातील श्रीमंत लोकांमधील एक आहेत (story of Vidal Health company mananging director Girish Rao).

गिरीश राव यांच्या कंपनीचा 3000 कोटींचा पोर्टफोलियो

गिरीश राव हे पेशाने मॅकेनिकल इंजेनिअर आहेत. पण त्या क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही. म्हणून त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. एका मोठ्या टेलिकॉम कंपनीचा सेल्स आणि मार्केटिंग विभाग सांभाळला. मात्र, आई-वडिलांच्या सेवेसाठी त्यांनी आरामशीर असलेल्या कॉर्पोरेट आयुष्याला सोडलं. कारण त्यांचे आई-वडील देशात वास्तव्यास होते. इथेच त्यांनी विदेल हेल्थ इन्शूरन्स कंपनी सुरु केली. आज या कंपनीला लोकांचा मोठा प्रतिसाद असून या कंपनीचा आज 3000 कोटींचा पोर्टफोलियो आहे. गिरीश यांच्या या जडणघडण विषयीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (story of Vidal Health company mananging director Girish Rao).

गिरीश राव यांच्या कामाची सुरुवात कशी?

गिरीश यांनी सुरुवातीला भारतात राहणाऱ्या आई-वडिलांच्या आरोग्यासाठी तसेच अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी एक व्यवसाय सुरु केला. अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतात आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता असते. कारण ते दोन्ही देशांमध्ये वारंवार प्रवास करु शकत नाहीत. त्यावेळी जेफ बेजोस हे इंटरनेटवर चॅपियन बनले होते. त्यांच्यापासून प्रेरित होऊन गिरीश यांनी एनआयआर आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी एक सर्व्हिस पोर्टल लाँच केलं. त्यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यामुळे 2002-03 दरम्यान त्यांचं मोठं नुकसान झालं.

विमा कंपनी उभारण्याची संधी कशी मिळाली?

दरम्यान, भारत सरकार खासगी क्षेत्रात आरोग्य वीमा सुरु करत होतं. यावेळी गिरीश यांच्या लक्षात आलं की, या वीमा कंपनीसाठी लागणारी सर्व मेहनत आपण आधीच करुन ठेवली आहे. आपल्याकडे भारतातील महत्त्वाच्या शहरांमधील रुग्णालयांचे नेटवर्क आहेत. याच विचारातून त्यांनी वीमा कंपनीसाठी अर्ज केला. त्यावर त्यांना परवानादेखील मिळाला. त्यानंतर त्यांनी जी यशाकडे इतकी मोठी उडी मारली की त्यांनी परत मागे फिरुन बघितलंच नाही.

गिरीश यांच्या विमा कंपनीचे आज 800 पेक्षा जास्त भागात काम

गिरीश यांची विदेल हेल्थ ही खासगी विमा कंपनीचे आज 800 पेक्षा जास्त ठिकाणी काम करत आहे. त्यांच्या सध्या 10 हजार पेक्षा जास्त सेवा प्रादातांसोबत भागीदारी आहे. यामध्ये रुग्णालय, डायग्नोस्टिक्स लॅब यांचा समावशे आहे. विदेल हेल्थ दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त क्लेम आणि आठ लाख प्रीम ऑथरायजेशन रिक्वेस्ट वितरीत करते. ही विमा कपंनी 3000 कोटी रुपये प्रीमियम पोर्टफोलियोला सांभाळते.

हेही वाचा : ‘या’ 5 बँकांमध्ये एफडी केल्यास मिळणार सर्वाधिक नफा, तुम्हालाही मिळेल फायदा