Swiggy चा कर्मचार्‍यांना दिलासा; आता आठवड्यातून फक्त चार दिवस काम, बाकी आराम

आता कर्मचारी आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करतील. अशा प्रकारे मे महिन्यात कर्मचार्‍यांसाठी फक्त चार दिवसांचे वर्क वीक असतील. Swiggy Food Delivery

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:08 PM, 4 May 2021
Swiggy चा कर्मचार्‍यांना दिलासा; आता आठवड्यातून फक्त चार दिवस काम, बाकी आराम
Swiggy Food Delivery

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशासह अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आलाय, यामुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद आहेत. अशा परिस्थितीत स्विगीच्या माध्यमातून जेवण देण्यासाठी होम डिलिव्हरी केली जात आहे. कठीण काळातही या ऑनलाईन फूड डिलिव्हरी फर्मचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने त्यांना दिलासा दिलाय. आता कर्मचारी आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करतील. अशा प्रकारे मे महिन्यात कर्मचार्‍यांसाठी फक्त चार दिवसांचे वर्क वीक असतील. (Swiggy relief to employees; Now only work four days a week)

कुटुंबीयांना या साथीच्या आजाराची लागण झाल्यास उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार

कोरोना काळात स्विगी तिच्या कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आगाऊ पगाराची रक्कम, रजा एन्कॅशमेंट आणि कर्जही देत ​​आहे. या व्यतिरिक्त कोणताही कर्मचारी कोरोनामुळे ग्रस्त असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या साथीच्या आजाराची लागण झाल्यास उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. ग्रेड 1 ते 6 च्या कर्मचार्‍यांना मे महिन्याच्या अखेरीस पगार देण्याचेही कंपनीने ठरवलेय. कंपनीचे एचआर हेड गिरीश मेनन यांनीही कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याबद्दल ईमेल पाठवलाय. ईमेलमध्ये असे लिहिले होते की, “आपण आठवड्यातून चार दिवस काम करायचं ठरवा आणि अतिरिक्त दिवस आपल्या कुटुंबाची आणि मित्रांची काळजी घेण्यासाठी वापरा.”

स्विगी कर्मचार्‍यांसाठी हेल्पलाईन सुरू

जर स्विगी कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले तर त्याला तातडीने कंपनीकडून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये बेड घेण्यास, आयसीयू, प्लाझ्मा, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादी मिळविण्यासाठी कंपनी त्याला मदत करेल. एवढेच नाही तर कर्मचार्‍यांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सहाय्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सहाय्यक हेल्पलाईन देखील सुरू केलीय. तसेच यासाठी अॅपही तयार करण्यात आलेय.

निधीतून जमवले 80 कोटी डॉलर

स्विगीने नुकत्याच एका नव्या राऊंडमध्ये 80 कोटी डॉलर जमा केलेत. तसेच कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि आपल्या लोक असे जवळपास दोन लाख डिलिव्हरी पार्टनसना लस देण्याची व्यवस्था केलीय.

संबंधित बातम्या

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असल्यास घर बसल्या भरा ऑनलाईन पैसे, ही पद्धत एकदम सोपी

SBI Alert! कोरोना संकटात ही 5 कामे चुकूनही करू नका, अन्यथा खाते होईल रिकामे

Swiggy relief to employees; Now only work four days a week