टाटाची जबरदस्त योजना, नियमित कमाईची संधी अन् पैशाच्या गुंतवणुकीत दुप्पट फायदा

डिव्हिडंड यील्ड फंड दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात, कारण फंड मॅनेजर केवळ देशातील अव्वल कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. tata mutual fund

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:38 PM, 4 May 2021
टाटाची जबरदस्त योजना, नियमित कमाईची संधी अन् पैशाच्या गुंतवणुकीत दुप्पट फायदा
Money

नवी दिल्लीः टाटाची नवीन योजना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आलीय. टाटा म्युच्युअल फंड डिव्हिडंड यील्ड फंड (tata mutual fund) असे त्याचे नाव आहे. 17 मे रोजी तो बंद होणार आहे. नव्या फंडाचा उद्देश प्रामुख्याने लाभांश देणाऱ्या कंपन्या आणि संबंधित उत्पादनांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे आहे. जेणेकरून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याबरोबर नियमित फायदाही मिळू शकेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लाभांश (dividend) फंड गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांचे जोखीम कमी करण्यास मदत करते. हे फंड नेहमीच त्या संस्थांशी संबंधित असतात, ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असतात, त्यामुळे भविष्यात नेहमीच अधिक चांगले काम करण्यास वाव असतो. डिव्हिडंड यील्ड फंड दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात, कारण फंड मॅनेजर केवळ देशातील अव्वल कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. (tata mutual fund launches dividend yield fund nfo to close on 17 may know everything)

लाभांशचे (dividend) पैसे कधी मिळतात?

म्युच्युअल फंड साधारणपणे दररोज, महिना, तिमाही किंवा वार्षिक लाभांश जाहीर करतात. लाभांशाची रक्कम निश्चित नसून ही योजना वेगवेगळी असू शकते. प्रत्येक फंड त्याच्या आधीच्या पद्धतीनुसार लाभांश देण्याच्या प्रक्रियेत एकसारखेपणा राखण्याचा प्रयत्न करतो. डिव्हिडंडमध्ये अजून एक पर्याय आहे, ज्याला डिव्हिडंड रिइव्हेन्टेड म्हणतात. यात गुंतवणूकदारास वाढ आणि लाभांश या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळतो. फरक म्हणजे डिव्हिडंड रक्कम गुंतवणूकदाराच्या खिशात जात नाही. त्या बदल्यात गुंतवणूकदाराला युनिट्स दिली जातात. हा पर्याय दीर्घ मुदतीसाठी फायदेशीर आहे.

योजनेबद्दल जाणून घ्या?

टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे सीआयओ (इक्विटी) राहुल सिंह म्हणतात की, सध्याचे मूल्यांकन पाहता शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही या निमित्ताने फंड लाँच करीत आहोत, डिव्हिडंडच्या नियमित उत्पन्नासह भांडवल वाढविण्यातही मदत होईल.

लाभांशबद्दल (dividend) जाणून घ्या?

कंपनीच्या एकूण नफ्यात गुंतवणूकदारांना दिलेला लाभांश म्हणजे डिव्हिडंड असतो. प्रत्येक भागाला लाभांश दिला जातो. म्हणजेच गुंतवणूकदाराचे जितके अधिक शेअर्स असतील, त्यातील लाभांश जास्त असेल. सातत्याने उत्कृष्ट लाभांश रेकॉर्ड असणार्‍या एखाद्या कंपनीत गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.

डिव्हिडंड यील्ड – डिव्हिडंड यील्ड शेअर्समध्ये सुरक्षित परताव्याची कल्पना देते, लाभांश उत्पन्न जितके जास्त असेल तितकी जास्त सुरक्षित गुंतवणूक होईल.

डिव्हिडंड यील्ड – डिव्हिडंड एक्स 100/शेअर प्रति शेअर किंमत, फक्त 4% पेक्षा जास्त डिव्हिडंड यील्ड असलेल्या कंपन्या डिव्हिडंडच्या आधारे अधिक चांगला फायदा देतात.

संबंधित बातम्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वेतननिश्चितीबाबत मोठा निर्णय

ICICI प्रुडेन्शियलच्या नव्या योजनेत मोठ्या कमाईची संधी; 1000 रुपयांपासून करा गुंतवणूक

tata mutual fund launches dividend yield fund nfo to close on 17 may know everything