केंद्र सरकार ‘या’ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणार, दरमहा पगार 15000 रुपयांनी वाढणार

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई आराम (डीआर) मध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती. ज्यामुळे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला.

केंद्र सरकार 'या' कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणार, दरमहा पगार 15000 रुपयांनी वाढणार
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:37 AM

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देणार आहे. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासह काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची घोषणा करणार आहे. केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीची केलेली विनंती सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी आदेशानुसार 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलीय.

कोणाचा पगार किती असेल?

या पदोन्नतीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 25,350 रुपयांवरून 29,500 रुपये होईल. सरकारच्या आदेशानुसार, रेल्वे बोर्ड सचिवालय सेवा (RBSS), रेल्वे बोर्ड सचिवालय स्टेनोग्राफर सेवा (RBSSS) च्या अधिकाऱ्यांना या वर्षी पदोन्नती दिली जाणार होती. या अधिकाऱ्यांना अवर सचिव/उपसचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदोन्नतीसह त्यांचे वेतन दरमहा सुमारे 15,000 रुपयांनी वाढेल. असे सांगितले जात आहे की, ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 67,700 रुपये आहे, त्यांचे वेतन दरमहा 78,800 रुपये होईल.

पदोन्नतीचे आदेश कधी जारी केले जातील?

मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता (डीए), परिवहन भत्ता, घरभाडे भत्ता (एचआरए) आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होईल. वेतन बँड श्रेणी III अंतर्गत येईल, जे 7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार आहे. केंद्र सरकारचा कार्मिक विभाग राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मंजुरी घेतल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आदेश जारी करेल. जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के आणि घरभाडे भत्ता 24 टक्के वरून 27 टक्के केला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढेल. यामुळे ते 31 टक्के होईल.

1 जुलैपासून महागाई भत्त्याची रक्कम वाढली

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई आराम (डीआर) मध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती. ज्यामुळे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला. आता डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे एप्रिल महिन्यात अर्थ मंत्रालयाने महागाई भत्त्यात वाढ (डीए) 30 जून 2021 पर्यंत रोखून धरली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए दर 17 टक्के होता.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

हा आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. 2017 मध्ये हा नियम करण्यात आला. कर्मचाऱ्याचा डीए त्याच्या बेसिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त असेल त्याच्या HRA मध्ये बदल केला जाईल. त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए जाहीर केला होता.

एचआरए आणि वेतन एकत्र देऊन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी बोनसचा लाभ देईल किंवा दोन्हीचे पैसे वेगवेगळे मिळतील, याबाबत कोणताही शासकीय निर्णय समोर आलेला नाही. परंतु सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना या ‘डबल बोनस’चा लाभ देऊ शकते. एचआरएचे पैसे वाढीव दराने मिळाल्याने पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.