रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर नेमके कोण?; कार्यकाळ किती असणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शनिवारी टी. रविशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. टी. रविशंकर यांचा कार्यकाळ 3 वर्षे असेल. Deputy Governor Reserve Bank T. Ravi Shankar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:03 PM, 3 May 2021
रिझर्व्ह बँकेचे नवे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर नेमके कोण?; कार्यकाळ किती असणार?
RBI Karnataka Co Operative Bank

नवी दिल्लीः केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक टी रविशंकर यांची केंद्रीय बँकेच्या चौथ्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली. 2 एप्रिल रोजी डेप्युटी गव्हर्नर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या बी. पी. कानूनगो यांच्याऐवजी शंकर हे कार्यभार सांभाळणार आहेत. यापूर्वी बी. पी. कानूनगो यांना एक वर्षाचा सेवाविस्तार मिळाला होता. गेल्या वर्षी ते निवृत्त होणार होते, पण सरकारने त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली. यंदा 2 एप्रिल रोजी ते निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी टी रविशंकर (T. Ravi Shankar) यांना घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शनिवारी टी. रविशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, टी. रविशंकर यांचा कार्यकाळ 3 वर्षे असेल. (The new Deputy Governor of the Reserve Bank, T. Ravi Shankar Who is exactly?)

रिझर्व्ह बँकेत किती डेप्युटी गव्हर्नर आहेत?

टी रविशंकर व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेमध्ये आणखी तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. मायकेल डी पात्रा असे पहिल्या डेप्युटी गव्हर्नरचे नाव असून, ते चलनविषयक धोरणाशी संबंधित विभाग सांभाळतात, त्यानंतर मुकेश कुमार जैन हे पहिले व्यापारी बँकर होते, तर राजेश्वर राव हे तिसरे डेप्युटी गव्हर्नर आहेत. बी. पी. कानूनगो यांच्याकडे ज्या विभागांचा पदभार होता, ते विभाग आता रविशंकर सांभाळणार आहेत. यात फिन्टेक, माहिती तंत्रज्ञान, पेमेंट सिस्टम आणि जोखीम देखरेख यांचा समावेश आहे.

ते रिझर्व्ह बँकेत कधी जॉईन झाले?

टी. रविशंकर हे फार पूर्वीपासून रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहेत. 1990 मध्ये ते रिसर्च ऑफिसर म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. शंकर यांचे बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण झाले आहे आणि तेथून विज्ञान आणि सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी घेतलीय. त्याच्या लिंक्डइन पोस्टवरून असे दिसून आले आहे की, त्यांनी आर्थिक विकास संस्थेच्या विकास नियोजनाचा डिप्लोमा घेतलाय.

त्यांना अनुभव किती?

टी रविशंकर यांना गेल्या वर्षी ‘इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस’ चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. ही संस्था रिझर्व्ह बँकेची सहाय्यक कंपनी आहे. यापूर्वी शंकर आंतरराष्ट्रीय स्तरावरही बर्‍याच संस्थांमध्ये काम करत आहेत. पूर्वी ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (आयएमएफ) जोडलेले होते. ते भारत सरकारच्या वतीने आयएमएफमधील बाँड बाजाराशी संबंधित बाबी पाहत होते. टी रविशंकर यांनी बांगलादेशच्या सेंट्रल बँकमध्येही काम केलेय.

टी. रविशंकर यांची मुख्य कामे

टी रविशंकर यांनी रिझर्व्ह बँकेत अनेक महत्त्वाची कामे हाताळणार आहेत, त्यात कर्ज व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या आहेत. पूर्वी कानूनगो ही कामे पाहायची, पण आता रविशंकरच ही जबाबदार सांभाळणार आहेत. टी रविशंकर हे देश आणि जगाच्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ते कोणत्याही आर्थिक समस्येवर त्यांचे मूळ विचार ठेवतात आणि त्यावर ठाम असतात. रविशंकर यांनी रिझर्व्ह बँकेच्या अशा अनेक समित्यांमध्ये काम केलेय, त्यांची महत्त्वपूर्ण भूमिकाही पाहिलीय. फंडावर आधारित कर्ज देणारी प्रणाली, वस्तूंच्या किमतींचे हेजिंग, कमोडिटी स्पॉट, डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट तसेच त्यांनी बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये काम केले आहे. ही कामे भांडवली आणि डॉलरच्या निधीशी संबंधित आहेत.

संबंधित बातम्या

परदेशातून येणाऱ्या मदतीवर आता IGST नाही; कोरोना काळात मोदी सरकारचा मोठा दिलासा

कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

The new Deputy Governor of the Reserve Bank, T. Ravi Shankar Who is exactly?