सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1145 अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटी बुडाले

16 फेब्रुवारीपासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली, जी सतत सुरू आहे. तीन आठवड्यांत प्रथमच सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली आलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:56 PM, 22 Feb 2021
सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1145 अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटी बुडाले
Nifty Sensex today

नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण नोंदवली गेलीय. 30 शेअर असलेला निर्देशांक सेन्सेक्स 1145 अंकांच्या घसरणीसह (-2.25%) 49,744 पातळीवर बंद झाला आणि 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 306 अंकांसह (-2.04%) खाली कोसळत 14675 वर बंद झाला. 16 फेब्रुवारीपासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली, जी सतत सुरू आहे. तीन आठवड्यांत प्रथमच सेन्सेक्स 50 हजारांच्या खाली आलाय. (The stock market crashed for the fifth day in a row; Sensex falls 1145 points; 3.79 lakh crore of investors sank)

इंडसइंड बँक आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये घसरण

ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स वाढलेत. त्याचबरोबर डॉ. रेड्डी, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेलीय. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य आता 200.19 लाख कोटींवर आलेय. गेल्या आठवड्यात ती 203.98 लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे आज गुंतवणूकदारांचे 3.79 लाख कोटींचे नुकसान झाले.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील कामगिरी

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या घसरणीमुळे देशातील दहा सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात 1.23 लाख कोटी रुपयांची घट झाली. गेल्या आठवड्यात बीएसईचा सेन्सेक्स 654.54 अंक म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरला आणि अव्वल दहा कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या शेअर्सची वाढ झालीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून, त्याचे बाजारमूल्य 44,672.14 कोटी रुपयांनी घसरून 11,52,770.11 कोटींवर गेले.

वाढत्या महागाईचा धोका

जागतिक आणि देशांतर्गत बाँड बाजारात अचानक वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात घट दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आठवड्यात भारताच्या दहा वर्षांच्या रोखे उत्पन्नात 17 बेसिस पॉईंटची वाढ झालीय. अमेरिकेतील 10 वर्षांच्या बाँड यील्डचं उत्पन्नही वाढलंय. जेव्हा बाँडचा दर किंवा बॉण्डवरील व्याज दर वाढतो तेव्हा त्याचा थेट परिणाम शेअर बाजाराच्या तेजीवर होतो. उत्पन्न वाढल्यास, शेअर बाजाराची घसरण होते, दुसरीकडे उत्पन्नातील घट गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित करते आणि त्यामुळे बाजारात तेजी येते. उत्पादनात वाढ म्हणजे चलनवाढ वाढणे अपेक्षित असते.

संबंधित बातम्या

‘या’ बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार

The stock market crashed for the fifth day in a row; Sensex falls 1145 points; 3.79 lakh crore of investors sank