सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार

गेल्या 2 महिन्यांत त्याच्या किमती सुमारे 4 हजारांनी वाढल्यात. अशा परिस्थितीत आपणही त्यात पैसे गुंतवणार असाल तर आपल्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:05 PM, 22 Apr 2021
सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार
gold invest 3 options

नवी दिल्लीः भारतातील गुंतवणुकीसाठी सोन्याला नेहमीच एक उत्तम पर्याय मानले जाते. कोरोना संकटातही गुंतवणूकदारांनी सोन्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमती निरंतर वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्यातील गुंतवणुकीसाठी (Gold Investment) ही वेळ योग्य आहे, कारण गेल्या 2 महिन्यांत त्याच्या किमती सुमारे 4 हजारांनी वाढल्यात. अशा परिस्थितीत आपणही त्यात पैसे गुंतवणार असाल तर आपल्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (how to invest in gold to get double profit these 3 options can be helpful in emergency)

गोल्ड ईटीएफमध्ये जोखीम नाही

गुंतवणुकीच्या वेळी अशी योजना निवडली पाहिजे, ज्यामध्ये जोखीम सर्वात कमी असेल. अशा परिस्थितीत गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे. हे अल्प आणि दीर्घकालीन दोन्हीसाठी वापरले जाते. त्यास स्टोरेजची आवश्यकता नाही. आपण आणीबाणीच्या वेळी ते पैसे वापरू शकता.

सोन्याचा बार घेताना शुद्धता तपासा

सोन्याच्या बारमध्ये गुंतवणूक करूनही तुम्ही कठीण वेळी पैशांची व्यवस्था करू शकता. त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी याची शुद्धता तपासून पाहा. कारण जितके शुद्ध सोने असेल तितकाच जास्त फायदा मिळणार आहे. म्हणून जर आपण एखाद्या प्रसिद्ध रिफायनरीकडून सोन्याचा बार खरेदी केला तर त्याची शुद्धता सर्वाधिक असेल. एमएमटीसी पीएएमपी आणि बंगळुरू रिफायनरीसारख्या काही ठिकाणी 24 कॅरेट सोनं घेता येईल. त्याचप्रमाणे आपण इतर रेट केलेल्या रिफायनरीजदेखील पाहू शकता.

फिजिकल सोन्यातही केली जाऊ शकते गुंतवणूक

शतकानुशतके देशात फिजिकल सोन्याचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. म्हणूनच कोरोना संकटातही आपण सोन्याचे दागिने विकत घेऊ शकता. सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता योग्यरित्या तपासा. यासाठी हॉलमार्किंग तपासणे विसरू नका. गरज भासल्यास सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा विक्री करून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात.

MCX वर सोन्याचा डिलिव्हरी दर

MCX वर सोन्याची डिलिव्हरी किंमतही कमी होत आहे. जूनच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 398 रुपयांनी घसरून 47830 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आणि ऑगस्टच्या वितरणासाठी सोन्याचा भाव 404 रुपयांनी घसरून 48100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

MCX वर चांदीचा डिलिव्हरी दर

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मे डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव प्रतिकिलो 621 रुपयांनी घसरून 69717 रुपये झाला आणि जुलैच्या चांदीचा भाव 600 रुपयांनी घसरून 70822 रुपये प्रति किलो झाला.

संबंधित बातम्या

Citibank नंतर आता ‘या’ बँकेची भारतातील व्यवसाय गुंडाळण्याची तयारी, जाणून घ्या ‘कारण’

विशेष श्रेणी वगळता औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा बंद; मोदी सरकारचा मोठा निर्णय

how to invest in gold to get double profit these 3 options can be helpful in emergency