1 जानेवारीपासून हे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार!

1 जानेवारीपासून हे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार!

मुंबई : काही डेबिट आणि क्रेडिट कार्ड 1 जानेवारीपासून बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ईएमव्ही चीपने बदलण्याचे निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, कारण, कार्ड बदलण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. नवीन कार्ड अगोदरच्या तुलनेत सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असून फसवणुकीपासून वाचण्यासाठी आरबीआयने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : काही डेबिट आणि क्रेडिट कार्ड 1 जानेवारीपासून बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ईएमव्ही चीपने बदलण्याचे निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, कारण, कार्ड बदलण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. नवीन कार्ड अगोदरच्या तुलनेत सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असून फसवणुकीपासून वाचण्यासाठी आरबीआयने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

आरबीआयने 27 ऑगस्ट 2015 रोजी एक आदेश जारी करत बँकांना कार्ड बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली होती. 1 सप्टेंबर 2015 पासून जारी केले जाणारे सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमव्ही चीपचे असतील, असं आरबीआयने स्पष्ट केलं होतं. बँकेकडूनही ग्राहकांना कार्ड बदलण्यासाठी मेसेज केला जात आहे.

सध्या चीप असणारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक मजबूत मानले जातात. ईएमव्ही कार्ड म्हणजेच युरो पे, मास्टर कार्ड आणि व्हिसा या कार्डमध्ये एक मायक्रोचीप असते, जी फसवणूक होण्यापासून ग्राहकांना वाचवते. ग्राहक जेव्हा खरेदी करतात तेव्हा या चीपमुळे बनावट व्यवहार होण्याची शक्यता कमी असते.

ईएमव्ही कार्ड ओळखणं सोपं आहे. ज्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर सोनेरी रंगाची चीप लावलेली असते, ते ईएमव्ही कार्ड आहेत. यामुळे कार्डची सुरक्षा अधिक मजबूत होते.

भारतात नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार आणि कॅशलेस व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पीओएस म्हणजे स्वाईप मशिनच्या माध्यमातून सध्या जास्त व्यवहार होत आहेत. तर ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यामुळे कार्डची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनला आहे. आरबीआय देखील सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें