‘या’ सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम?

संबंधित कायद्याचे पालन करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलत असून, केंद्रीय बँकेच्या संपर्कात आहोत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:11 AM, 26 Jan 2021
'या' सरकारी बँकेकडून 13 कोटी दंड आकारला, तुमच्या पैशांवर काय परिणाम?
IDFC First Bank

नवी दिल्लीः संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यवर्ती बँकेने मनी लाँडरिंग (Money laundering) कायद्याच्या उल्लंघनासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाला (Bank of Baroda) 13 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावलाय. यूएईच्या मध्यवर्ती बँकेने बँक ऑफ बडोदा, जीसीसी ऑपरेशन्स, दुबईला 6,833,333 अमिराती दिनारचा (13.56 कोटी) दंड ठोठावलाय. संबंधित कायद्याचे पालन करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलत असून, केंद्रीय बँकेच्या संपर्कात आहोत. त्याशिवाय अनुपालन सुधारण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. (UAE Central Bank Slaps Over Rs 13 Cr Monetary Sanction On Bank Of Baroda)

बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून बँका मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. बँकांवरील कारवाईचे अहवाल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना त्यांचे पैसे किती सुरक्षित असतात, याबद्दल भीती सतावत असते. या कारवाईमुळे त्यांच्या बँकांमधील जमा पैशाला कोणताही कोणताही धोका नाही, या बँकेत खाती असलेले लोकांचे बँकेतील पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. या विलीनीकरणाचा बँक ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही.

बँक ऑफ बडोदाने अलीकडेच विजया बँक आणि देना बँकेच्या 3,898 शाखांचे एकत्रीकरण आणि विलीनीकरण पूर्ण केले आहे. खरं तर विजया बँक आणि देना बँक 1 एप्रिल 2019 रोजी बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या. बँक ऑफ बडोदाने डिसेंबर 2020 मध्ये देना बँकेच्या 1,770 शाखांचे एकत्रीकरण पूर्ण केले, तर सप्टेंबर 2020 मध्ये विजया बँकेच्या 2,128 शाखा बँक ऑफ बडोदामध्ये एकत्रित करण्यात आल्यात.

संबंधित बातम्या

कोरोना काळात शेतीनं दिली साथ, यंद्याच्या Budget मध्ये मिळणार का शेतकऱ्यांना दिलासा?

LIC Policy: दररोज अवघ्या 160 रुपयांच्या बचतीवर मिळणार 23 लाख; टॅक्स बेनिफिट्स आणि इतर अनेक फायदे

UAE Central Bank Slaps Over Rs 13 Cr Monetary Sanction On Bank Of Baroda