Aadhaar : आता घरबसल्या अपडेट करा आधार; नाव, पत्ता आणि DOB बदलता येणार

पुन्हा एकदा UIDAI ती सुविधा सुरू केलीय. Uidai Starts New Service Now You Can Update Your Name Address Gender And DOB In Aadhaar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:51 PM, 23 Dec 2020
Aadhaar : आता घरबसल्या अपडेट करा आधार; नाव, पत्ता आणि DOB बदलता येणार

नवी दिल्लीः जर आपल्याला आधारसंबंधी कोणतीही माहिती अपडेट करायची असल्यास आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI ने ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. आता आपण पुन्हा एकदा घरबसल्या आपलं नाव, पत्ता आणि जन्मतारीख (Date of Birth) आणि जेंडर (Gender) अपडेट करू शकता. UIDAI पत्त्याशिवाय सर्व डेमोग्राफिक डिटेल्सला अपडेट करण्याची सुविधा बंद केली होती. परंत पुन्हा एकदा UIDAI ती सुविधा सुरू केलीय. (Uidai Starts New Service Now You Can Update Your Name Address Gender And DOB In Aadhaar)

UIDAI ने केले ट्विट

UIDAI ने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिलीय. आता घरबसल्या आपण UIDAI च्या वेबसाइटवर नाव, पत्ता, जन्मतारीख आणि जेंडर अपडेट करू शकता. पण आता ही सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

घर बसल्या करू शकता अपडेट

>> पहिल्यांदा आपल्याला ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल
>> इथे आपल्याला माय आधार सेक्शनमध्ये जाऊन ‘अपडेट युवर आधार’ वर क्लिक करा
>> त्यानंतर ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ वर क्लिक करावे लागेल
>> नवीन पेज ओपन केलं जाईल.
>> त्याशिवाय आपण डायरेक्ट https://ssup.uidai.gov.in/ssup/ विझिट करू शकता.
>> इथे आपल्याला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल
>> नव्या ओपन झालेल्या पेजवर 12 डिजिटचा आधार नंबर नोंदवा
>> कॅप्चा कोड टाकल्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा
>> रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येणाऱ्या ओटीपीला निर्धारित स्पेस टाकून सबमिट करा.
>> नव्या उघडलेल्या पेजवर आपल्याला दोन पर्याय मिळतील
1. सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफबरोबर एड्रेससह डेमोग्राफिक डिटेल्सचं अपडेशन
2. एड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे एड्रेस अपडेट करा
>> नाव, जन्मतारीख, लिंग, पत्त्यासारखे कोणतेही डॉक्युमेंट्स प्रूफसह अपडेट करण्यासाठी अपडेट डेमोग्राफिक्स डेटावर क्लिक करा.
>> त्यानंतर आपल्याला जी माहिती अपडेट करायची आहे, ती निवडा. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

रजिस्टर्ड मोबाइल नंबर हवा

ऑनलाइन अपडेशनच्या वेळी नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल. कारण आपल्याला सर्व ओटीपी त्याच नंबरवरून प्राप्त होणार आहेत.

संबंधित बातम्या

आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!

आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग; फक्त करा एक काम

Uidai Starts New Service Now You Can Update Your Name Address Gender And DOB In Aadhaar