‘या’ बँकांचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, चेकबुक आणि IFSC वर तीन महिन्यांची मुदतवाढ

1 एप्रिल 2021 ला कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. यानंतर या बँकांच्या चेकबुक आणि आयएफएससी कोड बदलण्यात येणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:35 PM, 2 Apr 2021
'या' बँकांचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, चेकबुक आणि IFSC वर तीन महिन्यांची मुदतवाढ
DCB bank

नवी दिल्लीः जर तुमचे बँक खाते युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक किंवा कॉर्पोरेशन बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2021 ला कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. यानंतर या बँकांच्या चेकबुक आणि आयएफएससी कोड बदलण्यात येणार आहेत. (Union Banks Offer Relief To Crores Of Customers, Three Month Extension On Checkbooks And IFSC)

आयएफएससी कोड आणि चेकबुकमध्ये 30 जूनपर्यंत बदल होणार नाही

परंतु युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष घोषणा केलीय. या तिन्ही बँकांच्या आयएफएससी कोड आणि चेकबुकमध्ये 30 जूनपर्यंत बदल होणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केलेय. युनियन बँक ऑफ इंडियाने याबाबत ट्विट करून माहिती दिलीय. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे सध्याचे IFSC कोड आणि चेकबुक 30 जून 2021 पर्यंत वैध राहतील, अशी माहिती बँकेने ग्राहकांना दिलीय. यूबीआयच्या या घोषणेनंतर दोन्ही बँकांच्या ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंत दिलासा मिळालाय.

घर बसल्या नवे चेकबुक मिळेल

या तीन महिन्यांत ग्राहकांची इच्छा असल्यास आपण ते आपलं जुनं चेकबुक बदलून घेऊ शकतात. दरम्यान, जर त्यांना इच्छा असेल तर ते जुन्या चेकबुकद्वारे पैसे देखील काढू शकतात. ग्राहकांना घरी बसून आयएफएससी कोड किंवा चेकबुक मागण्याचा पर्याय देखील आहे. यासाठी 4 मार्ग आहेत.

या टप्प्यांचं पालन करा

1. युनियन बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर जा आणि Amalgamation Center वर क्लिक करा.
2. IFSC <ओल्ड IFSC> लिहून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 09223008486 वर मेसेज करा
3. आपण आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 1800-208-2244 / 1800-425-1515 / 1800-425-3555 वर कॉल करू शकता.
4. आपणास हवे असल्यास आपण थेट बँक शाखेत जाऊन आपले कामही पूर्ण करू शकता.

संबंधित बातम्या

अ‍ॅक्सिस बँकेचा ग्राहकांना धक्का! आता SMS सह ‘या’ सुविधेसाठी पैसे वसूल करणार

दोन बड्या सरकारी बँकांचा IFSC कोड बदलला, ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

Union Banks Offer Relief To Crores Of Customers, Three Month Extension On Checkbooks And IFSC