Virat Kohli : कंपनीचा कमाईत झेंडा; झटक्यात कमावले 838 कोटी, विराट कोहलीने छापल्या नोटा
Virat Kohli Networth : शुक्रवारी ऑलराऊंडर विराट कोहली याची फेव्हरेट कंपनी गो डिजिटच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली. BSE च्या ताज्या आकड्यांनुसार, गो डिजिटच्या शेअरमध्ये 2.73 टक्क्यांपर्यंत तेजी दिसली. हा शेअर 342.60 रुपयांवर बंद झाला.
स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने पर्थ मालिकेत त्याचा 81 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. तेव्हापासून त्याला धडाधड आनंदवार्ता येत आहेत. आता त्यांची सर्वात आवडती कंपनी गो डिजिटच्या शेअरने कमाल केल्याची वार्ता येऊन धडकली आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 838 कोटी रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. या घडामोडींचा विराट कोहलीच्या कमाईवर परिणाम दिसून आला. त्याची कमाई वाढली. कोहलीने या कंपनीत विराट गुंतवणूक केली आहे. गो डिजिटचा शेअर वधारल्याने कोहलीला 24 लाख रुपयांहून अधिकचा फायदा झाला आहे. गेल्या काही वर्षात विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने कंपनीकडून 7 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे.
गो डिजिटच्या शेअरमध्ये वाढ
शुक्रवारी विराट कोहलीची आवडती कंपनी गो डिजिटच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. बीएसई आकड्यांनुसार, गो डिजिटच्या शेअरमध्ये 2.73 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 342.60 रुपयांवर बंद झाला. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 344.30 रुपयांपर्यंत पोहचला. कंपनीचा शेअरमध्ये किंचित घसरण होऊन हा शेअर 330.15रुपयांवर उघडला. हा शेअर 4 सप्टेंबर रोजी 407.55 रुपयांसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. 4 जून रोजी कंपनीचा शेअर 277.80 रुपयांसह 52 आठवड्यांच्या निच्चांकावर पोहचला.
मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ
गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ दिसून आली. आकड्यांनुसार, कंपनीचे मार्केट कॅप 800 कोटी रुपयांहून अधिकने वाढले. एक दिवसापूर्वी गुरूवारी जेव्हा शेअर बाजार बंद झाला, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 30,728.65 कोटी रुपये होते. शुक्रवारी त्यात वाढ होऊन भांडवल 31,567.13 कोटी रुपये झाले. म्हणजे गो डिजिटच्या मार्केट कॅपमध्ये 838.48 कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
विराट कोहलीला इतका मोठा फायदा
गो डिजिटच्या मार्केट कॅपमध्येच वाढ झाली असे नाही तर कोहलीला पण विराट फायदा झाला आहे. या कंपनीचे विराटकडे 2 लाख शेअर आहेत. तर त्याची पत्नी अनुष्का हिच्याकडे कंपनीचे 66,667 इतके शेअर आहेत. म्हणजे दोघांकडे या कंपनीचे 266,667 शेअर आहेत. गुरूवारी या शेअरचे मूल्य 8,89,33,444.5 कोटी रुपये होते. तर शुक्रवारी या शेअरची किंमत 9,13,60,114.2 रुपयांवर पोहचली. विराट आणि अनुष्काला या घडामोडींमुळे 24,26,669.7 रुपयांचा फायदा झाला. या दोघांनी कंपनीत 75 रुपये प्रति शेअर प्रमाणे 2,00,00,025 रुपये गुंतवणूक केली होती. आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 7,13,60,089.2 रुपयांवर पोहचले आहे.