SBI कडून स्पेशल ऑफर, YONO अ‍ॅपद्वारे खरेदी केल्यास मिळणार 50 टक्क्यांपर्यंत सवलत

एसबीआयची ही ऑफर 4 मार्च ते 7 मार्चपर्यंत चालणार आहे. परंतु योनो अ‍ॅपद्वारे खरेदी करून कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:09 PM, 3 Mar 2021
SBI कडून स्पेशल ऑफर, YONO अ‍ॅपद्वारे खरेदी केल्यास मिळणार 50 टक्क्यांपर्यंत सवलत
YONO Super Saving Days

नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियानं योनो अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदीदारांना कॅशबॅकची सुविधा देण्याची मोठी घोषणा केलीय. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयची ही ऑफर 4 मार्च ते 7 मार्चपर्यंत चालणार आहे. परंतु योनो अ‍ॅपद्वारे खरेदी करून कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. (YONO Super Saving Days: SBI offers upto 50% discount on hotel booking)

एसबीआयकडून स्पेशल ऑफर देण्याची घोषणा

गेल्या काही वेळापासून एसबीआय प्रत्येक महिन्याला अशाच प्रकारे स्पेशल ऑफर देण्याची घोषणा करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून या स्पेशल ऑफरची माहिती दिलीय. 4 ते 7 मार्चदरम्यान योनो अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मोठा डिस्काऊंट मिळणार आहे.

कॅशबॅक ऑफरचा फायदा मोठ्या ब्रँड्सच्या प्रोडक्टवरही मिळणार

एसबीआयच्या या कॅशबॅक ऑफरचा फायदा मोठ्या ब्रँड्सच्या प्रोडक्टवरही मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन, अपोलो, ओयो, रेमंड आणि वेदांतु यांसारख्या शॉपिंग साईट्सचे पेमेंट योनो अ‍ॅपच्या माध्यमातून केल्यास पैशांची मोठी बचत होऊ शकते. योनो अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉनवर शॉपिंग केल्यास 7.5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळतो. तसेच ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip.com च्या माध्यमातून फ्लाईट तिकीट, हॉटेल, बस तिकीट आणि हॉलिडे पॅकेज बुक केल्यास 850 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

औषधे खरेदी केल्यास त्यावरही 20 टक्के सूट मिळणार

तसेच योनो अ‍ॅपद्वारे औषधे खरेदी केल्यास त्यावरही 20 टक्के सूट मिळणार आहे. औषधांशिवाय आरोग्याशी संबंधित प्रोडक्ट्स योनो अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी केल्यास सवलत मिळणार आहे. कपड्यांच्या शॉपिंगदरम्यान रेमंडमधून कपडे घेतल्यास योनो अ‍ॅपच्या पेमेंटवर 20 टक्के सूट मिळणार आहे. वेदांतुवरून कोणतीही खरेदी केल्यास 50 टक्के आणि त्याशिवाय 25 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. योनो अ‍ॅपच्या माध्यमातून ओयो हॉटेल बुकिंग केल्यास 50 टक्के डिस्काऊंट मिळते. त्याशिवाय हॉटेलसंबंधित दुसऱ्या सुविधांसाठी अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट केल्यास डिस्काऊंट मिळणार आहे.

एसबीआयचे देशभरात 49 कोटी ग्राहक

स्टेट बँकेच्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवर दररोज 4 लाख ट्रान्झॅक्शन होणार आहेत. 55 टक्के ट्रान्झॅक्शन हे डिजिटल फ्लॅटफॉर्मद्वारे होणार आहे. यातील अर्धे ट्रान्झॅक्शन योनो अ‍ॅपच्या माध्यमातूनच होतात. एसबीआयचे देशभरात 49 कोटी ग्राहक आहे. ज्यात 2.76 कोटी योनो अ‍ॅपचा वापर करतात. योनो एसबीआयचे डिजिटल बँकिंग अ‍ॅप आहे. यात 24 नोव्हेंबर 2017 ला लाँच केलं गेलंय. योनो अ‍ॅप हे बँकिंग, लाईफस्टाईल, इश्युरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि शॉपिंगसंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आलंय.

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

…तर MSME क्षेत्राला होईल फायदा फायदाच; नितीन गडकरींनी सांगितला ‘कानमंत्र’

YONO Super Saving Days: SBI offers upto 50% discount on hotel booking