7 वा वेतन आयोग: 12 वी पाससाठी सरकारी नोकरी, ‘असा’ करा अर्ज

हरियाणा कर्मचारी निवड आयोगात सरकारी नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:56 PM, 12 Jan 2021
Haryana Police Constable Recruitment

नवी दिल्लीः हरियाणामधील पोलीस विभागात बंपर भरती निघाली आहे. हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने (HSSC) पोलीस हवालदार भरतीसाठी एकूण 7298 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. 11 जानेवारी 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. हरियाणा कर्मचारी निवड आयोगात सरकारी नोकरी (Government Job) मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे. (7th Pay Commission Haryana Police Constable Recruitment 2021 Apply On hsscgovin For Sarkari Naukari)

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी पास (12th Pass Jobs) आणि 10 वीच्या इयत्तेत हिंदी किंवा संस्कृतमधील दहावी अनिवार्य आहे. त्याचबरोबर किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित केली गेली आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2021 रोजी केली जाईल. वरील पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल वेतन 21,700 रुपयांवरून 69,100 रुपये निश्चित केले गेले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा

उमेदवारांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी (पीएसटी) च्या आधारे निवड केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी (पीएसटी) द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि वजन तपासणी (पीएमटी) करावे लागेल. या भरतीसाठी लेखी परीक्षा 27 आणि 28 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना हरियाणा कर्मचारी निवड आयोगाच्या (एचएसएससी) http://www.hssc.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

पुरुष कॉन्स्टेबल (General duty) : 5500 पदे
महिला कॉन्स्टेबल (General duty) : 1100 पदे
एचएपी-दुर्गा -1 साठी महिला कॉन्स्टेबल: 698 पदे

संबंधित बातम्या

Special Story ! सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण; ‘या’ सरकारी विभागात बंपर भरती!

Special report | माझगाव डॉकमध्ये 410 पदांवर निघाली भरती; 8 वी पासना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

7th Pay Commission Haryana Police Constable Recruitment 2021 Apply On hsscgovin For Sarkari Naukari