नवी दिल्लीः BDL Recruitment 2021: आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी आणखी एक चांगली संधी आहे. खरं तर भारत डायनामिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited, BDL) ने अॅप्रेंटिस पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 13 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित अर्जाच्या नमुनाद्वारे 05 मार्च 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार https://bdl-india.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Bdl Recruitment 2021 Bharat Dynamics Limited Bdl Has Invited Applications For The Apprentice Posts)
Http://apprenticeshipindia.org अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचनेनुसार फिटरच्या 7 पदांवर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 04, इलेक्ट्रिशियनच्या 2 पदांवर नेमणुका केल्या जातील. त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास आणि आयटीआय पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे. दुसरीकडे आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारक या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांना टीए, डीए देण्यात येणार नाही. या व्यतिरिक्त भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आवश्यकतेनुसार रिक्त पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकते. हा अधिकार पूर्णपणे BDL ने राखून ठेवला आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त कोणत्याही मोडमधून पाठविलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही ही गोष्टही उमेदवारांनी लक्षात ठेवावी. त्याच वेळी या नियुक्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. याशिवाय बीडीएलने नुकतीच अॅप्रेंटिसच्या पदांसाठी भरती केली होती. त्यापैकी पदवीधर अॅप्रेंटिस आणि प्रशिक्षणार्थी अॅप्रेंटिस या पदांसाठी भरती घेण्यात आली. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया 2 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत चालली.
याखेरीज दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी नुकतीच भरती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 1145 शिक्षकेतर पदे नियुक्त केली जातील. अशा परिस्थितीत या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनटीएद्वारे डीयू नॉन टीचिंग रिक्रूटमेंट 2021 पोर्टल recruitment.nta.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 16 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
संबंधित बातम्या
IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये
UCIL Recruitment 2021: 47 जागांवर बंपर भरती, शासकीय नोकरीसाठी करा अर्ज
Bdl Recruitment 2021 Bharat Dynamics Limited Bdl Has Invited Applications For The Apprentice Posts