नवी दिल्लीः संगणक विज्ञान आणि माहिती, तंत्रज्ञान क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत, भारत सरकार वैज्ञानिक सोसायटी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्युटिंग (CDAC Recruitment 2021 ) म्हणजेच सीडॅकमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मोबाईल अॅप्लिकेशन डिझाइन अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रांत अनेक भरती निघाल्या आहेत. (Cdac Recruitment 2021 Apply For Software Developer Or Application Developer 72 Post)
या 72 पदांसाठी भरती सीडॅकच्या नोएडा मुख्यालयासाठी आहेत. सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मोबाईल अॅप्लिकेशन डिझाईन अँड डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन या क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता या पदांसाठी सीडॅक, नोएडामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सीडॅक, नोएडा सध्या डिजिटल हेल्थ, ई-गव्हर्नन्स, ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्झिट अॅप्लिकेशन्स, कम्युनिकेशन्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस /मशीन लर्निंग/डीएल आणि अॅनालिटिक्स, स्मार्ट कार्ड-ओएस डेव्हलपमेंट इत्यादीमधील राष्ट्रीय महत्त्व असलेल्या विविध प्रकल्पांवर काम करीत आहे.
खालील पदांसाठी निव्वळ कंत्राटी पद्धतीच्या आधारे नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रकल्प व्यवस्थापक सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट – 04
प्रकल्प व्यवस्थापक सोल्यूशन आर्किटेक्ट – 04
या पदांसाठी एमई, एमटेक आणि पीएचडीनंतर 04 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपर – 05
सॉफ्टवेअर डेव्हलपर – 05
या पदांसाठी 05 ते 10 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपर -05
सॉफ्टवेअर डेव्हलपर – 45
मोबाइल अनुप्रयोग डेव्हलपर आणि इम्प्लिमेंटेशन – 04
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी 23 फेब्रुवारी 2021 रोजी मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. यानंतर ऑनलाईन मुदत करण्याची वेळ संपुष्टात येईल, सीडॅकच्या वतीने या पदांची भरती करार तत्त्वावर केली जात आहे. कंत्राट जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी असेल. या नियुक्त्या सीडॅकच्या नोएडा सेक्टर 62 मध्ये असलेल्या संशोधन इमारतीसाठी आहेत.
सीडॅकच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात. सरकारशी संबंधित कोणत्याही सरकारी विभागात काम करणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागेल. त्यांना गट समन्वयक (एचआर), सीडॅक, संशोधन भवन, सी-56/1, संस्था क्षेत्र, सेक्टर -62, नोएडा -201309 (उत्तर प्रदेश) यांना विहित नमुन्यातील अर्ज जमा करावा लागतो.
संबंधित बातम्या
UCIL Recruitment 2021: 47 जागांवर बंपर भरती, शासकीय नोकरीसाठी करा अर्ज
बेरोजगारांसाठी चांगली बातमी! ही कंपनी 200 नवीन नोकऱ्या देणार
Cdac Recruitment 2021 Apply For Software Developer Or Application Developer 72 Post