हक्काच्या सेंट्रल बँकेत जम्बो भरती, घसघशीत पगार; या शहरांमध्ये नोकरीची संधी
आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला बँकेत काम करायचं असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड-1 पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 9 फेब्रुवारी 2025 पूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना वाचा.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे असेल.
रु. 850/- + जीएसटी असेल. अनुसूचित जाती/जमाती/पीडब्ल्यूडी उमेदवार/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175/- रुपये + जीएसटी आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21-01-2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09-02-2025
ऑनलाईन परीक्षेची संभाव्य तारीख : मार्च 2025
मुलाखतीची संभाव्य तारीख: नंतर जाहीर होणार
वयोमर्यादा किती असावी (30.11.2024 रोजी)
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष असावे. त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा 32 वर्ष ठेवण्यात आली आहे.
पात्रता काय असावी?
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे मेडिकल, इंजिनीअरिंग, सीए ची डिग्री असेल तर तुम्ही देखील या पदावर अर्ज करू शकता. सर्वप्रथम या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झालात तर तुम्हाला अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
पगार किती मिळेल?
जर तुमची या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला दरमहा 48480-85920 पगार मिळेल.
भरती तपशील येथे पहा
अहमदाबाद – 123
चेन्नई – 58
गुवाहाटी – 43
हैदराबाद – 42
अर्ज करण्यासाठी काय करावं?
अर्ज करण्यासाठी centralbankofindia.com अधिकृत संकेतस्थळावर जा.
येथे आपल्याला होम पेजवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिसशिप भरती लिंक दिसेल.
यानंतर तुम्हाला ‘अप्लाई’ बटणावर क्लिक करावं लागेल.
तेथे आपली माहिती टाका आणि फॉर्म भरा.
यानंतर तुम्हाला पैसे मोजावे लागतील.
फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट ठेवा.
विविध प्रकारच्या सरकारी जाहिराती येत असतात. त्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करू शकतात. कारण, पदवी स्तरावरील अनेक जाहिराती देखील निघत असतात. यासाठी विविध प्रकारच्या वेबसाईट्स अपडेट देतात. तुम्ही तुमचा अभ्यास परिपूर्ण केला की तुम्हाला त्याचा इतरही परीक्षेत उपयोग होऊ शकतो. फक्त ती परीक्षा ही पदवी स्तरावरील असावी. यात काही अपवादही आहेत.