कोरोना संकटातही चांगली बातमी! ही आयटी कंपनी यंदा कॅम्पसमधून 25 हजार नोकऱ्या देणार

मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झालीय. असे असूनही कंपनी कौशल्य राखण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. Good news even in the Corona crisis

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:19 PM, 14 Apr 2021
कोरोना संकटातही चांगली बातमी! ही आयटी कंपनी यंदा कॅम्पसमधून 25 हजार नोकऱ्या देणार
Good news even in the Corona crisis

नवी दिल्लीः भारताची दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 25000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट 15 टक्के होता (attrition/कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा दर). जुलै 2021 पासून कंपनीने सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिलीय. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झालीय. असे असूनही कंपनी कौशल्य राखण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. (Good news even in the Corona crisis! This IT company will provide 25,000 jobs from the campus this year)

कोरोना महामारीमुळे कंपनीने 2020 मध्ये दरवाढ दिली नव्हती

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारीमुळे कंपनीने 2020 मध्ये दरवाढ दिली नव्हती. यावर्षी जानेवारीत कंपनीने पहिल्या टप्प्यातील वाढ जाहीर केली. यावर्षी 25 हजार नोकरदारांपैकी भारतीय कॉलेजमधून 24 हजार तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे. तर एक हजार कर्मचारी हे फ्रेशर्स असतील. आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये कंपनीने 19 हजार कॅम्पस हायरिंग भारत आणि इतर देशांच्या महाविद्यालयातून 2000 हायरिंग केले होते.

कंपनीत 2.60 लाख कर्मचारी काम करत आहेत

आर्थिक वर्ष 2021 अखेर कंपनीत कार्यरत कर्मचार्‍यांची एकूण संख्या 2 लाख 59 हजार 619 होती. मार्च तिमाहीत कंपनीचा यूटिलायझेशन रेट 87.70 टक्के होता. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने या आठवड्यात हा निकाल जाहीर केला. टीसीएसने असेही म्हटले आहे की, यावर्षी 40 हजार लोकांना नोकरी दिली जाईल. मागील वर्षीही कंपनीने 40 हजार लोकांना नोकर्‍या दिल्या. टीसीएसचा एंट्रिशन दर 7.2 टक्के आहे.

कंपनीच्या नफ्यात 17 % वाढ

दरम्यान, इन्फोसिसने आज मार्च तिमाहीत निकाल जाहीर केला. मार्च तिमाहीत कंपनीला 5076 कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यात 17.10 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत कंपनीला 4321 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 26311 कोटी रुपये होता, तर 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण कमाई 1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

9200 कोटी रुपयांचा शेअर बायबॅक, 15 रुपयांचा लाभांश

त्याशिवाय इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 9,200 कोटींच्या शेअर बायबॅक योजनेला प्रति शेअर 1750 रुपये दराने मान्यता दिली. कंपनीने प्रति शेअर 15 रुपये लाभांश देण्याचीही घोषणा केली. इन्फोसिस ऑफ डायरेक्टर बोर्डने भागधारकांना 15,600 कोटी रुपयांचे भांडवली पैसे काढण्याची शिफारस केली. यामध्ये अंतिम लाभांश म्हणून 6,400 कोटी रुपये आणि समभागांची परतावा खरेदीद्वारे 9,200 कोटी रुपये भागधारकांच्या खिशात पोहोचतील.

संबंधित बातम्या

Railways Special Trains List: मुंबई, पुण्यातून परराज्यात जाणाऱ्यांसाठी ‘या’ विशेष गाड्या, एका क्लिकवर संपूर्ण लिस्ट

Gold Price Today: लग्नाच्या हंगामातच स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Good news even in the Corona crisis! This IT company will provide 25,000 jobs from the campus this year