Special Story | केंद्र आणि राज्यांतील विविध विभागांत सरकारी नोकरीची भरती, संधीचं सोनं करा!

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांत सरकारी नोकरीसाठी भरती करण्यात येत आहेत.

  • वैभव देसाई, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 6:35 AM, 17 Jan 2021
Special Story | केंद्र आणि राज्यांतील विविध विभागांत सरकारी नोकरीची भरती, संधीचं सोनं करा!

नवी दिल्लीः प्रत्येक जण सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरीही काही जणांना नोकरी मिळत नसल्याने ते निराश होतात. पण आता घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण कठोर परिश्रम करून, योग्य संधीची वाट पाहणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य वेळी अर्ज न केल्या आपले कठोर परिश्रम वाया जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांत सरकारी नोकरीसाठी भरती करण्यात येत आहेत. त्यामुळे या नोकरीच्या संधी गमावू नका. (Government Job 2021 Live Govt Jobs Results News Updates Apply For Niti Aayog)

NITI Aayog मध्ये नोकरीसाठी त्वरित अर्ज करा, तुम्हाला बरेच फायदे मिळतील
NITI Aayog Recruitment 2021 : नीती आयोगानं अनेक पदांवर भरती काढली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार केवळ 24 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अर्ज फी भरावी लागत नाही. आपल्याला दिल्लीत सहजपणे सरकारी नोकरी मिळू शकते. एवढेच नाही तर आपल्याला दरमहा 60,000 पर्यंत पगारही मिळू शकतो. म्हणून लवकरच अर्ज करा.

NHPC: आपण 18 वर्षांचे असल्यास विनामूल्य अर्ज करा
NHPC Recruitment 2021: एनएचपीसी लिमिटेड (National Hydroelectric Power Corporation) मध्ये अनेक पदे रिक्त आहेत. या नेमणुका ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या रिक्त पदांवर असणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे आणि अर्जदारांना कोणत्याही प्रकारची अर्ज फी भरावी लागणार नाही. दहावी पास उमेदवारही या नोकरीस पात्र ठरणार आहेत.

UPSC: निवड मुलाखतीतून होणार, आजच अर्ज करा
UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बर्‍याच पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. असिस्टंट डायरेक्टर (शिपिंग), सहाय्यक प्रोफेसर यांच्यासह इतरही अनेक पदे आहेत. खास बाब म्हणजे उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

UPPSC : राज्य सरकारमध्ये थेट नोकरीची संधी, अर्ज करा
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. आपण देखील 21 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास संबंधित वेबसाईटला भेट देऊन त्वरित अर्ज करा.

केंद्रीय विद्यालयात परीक्षा न घेता मिळणार सरकारी नोकरी
KVS Recruitment 2021: केंद्रीय विद्यालय संघटनेत (KVS) उपायुक्तांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यावी लागेल आणि अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. एवढेच नव्हे तर 209200 रुपयांपर्यंतचे मासिक वेतनही निश्चित केले गेले आहे.

टाटा संस्थेत विविध पदांवर नोकरी, 1 लाखाहून अधिक पगार
TIFR Recruitment 2021 : टाटा संस्थेने बर्‍याच पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकतात आणि तुमची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

महाराष्ट्र मेट्रोमध्ये दहावी पास उमेदवारांना मिळणार नोकऱ्या
MAHA Metro Recruitment 2021: मेट्रो रेलमध्ये सरकारी नोकरी मिळविणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. टेक्निशियन ते स्टेशन कंट्रोलर, विभाग आणि कनिष्ठ अभियंता यांसह अनेक वेगवेगळ्या पदांवर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये शासकीय भरती घेण्यात आलीय. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2021 आहे. या नोकरीत चांगला पगार देखील मिळतोय.

NIHFW मध्ये सरकारी नोकर्‍या, आजच अर्ज करा
NIHFW Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफसह इतरही अनेक पदांसाठी भरती काढण्यात आलीय. विशेष म्हणजे या नोकरीसाठी पदवीधारक ते आठवी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.

ऑईल इंडियामधील अनेक पदांवर भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी
OIL India Recruitment 2021: ऑईल इंडियामध्ये (OIL India) अनेक पदांवर भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार 19 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. आयटी अभियंता, केमिस्ट यांच्यासह अनेक रिक्त पदांवर जागांवर ही भरती करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त चांगला पगारही निश्चित करण्यात आलाय. खास गोष्ट अशी आहे की, आपल्याला कोणत्याही प्रकारची अर्ज फी भरण्याची गरज नाही.

Cochin Shipyard: सरकारी नोकरी केवळ ऑनलाईन परीक्षेद्वारे उपलब्ध होणार
Cochin Shipyard Recruitment 2021: कोच्ची शिपयार्ड लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती करण्यात येत आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2021 पासून सुरू झालीय. या पदांवर उमेदवारांना 77,000 पर्यंत पगारही मिळतोय. खास गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल आणि आपल्याला नोकरी मिळेल.

AAI : 29 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी
AAI Recruitment Last Date Extended: विमानतळ प्राधिकरणाने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविलेत. ज्यासाठी अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 29 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आलीय. हे पूर्वी 14 जानेवारी 2021 पर्यंत नियोजित होते. या पदांवर 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये वेतन निश्चित केले गेलेय.

संबंधित बातम्या

दहावी आणि बारावीनंतर सैन्यात कोणकोणत्या पदांसाठी भरती होता येईल? वाचा सविस्तर

Special Story ! सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण; ‘या’ सरकारी विभागात बंपर भरती!

Government Job 2021 Live Govt Jobs Results News Updates Apply For Niti Aayog