IBPS Office Assistant Result 2020: आयबीपीएस ऑफिस असिस्टंट परीक्षेचा निकाल जाहीर

उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे निकाल तपासू शकतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:40 PM, 21 Jan 2021
IBPS Office Assistant Result 2020: आयबीपीएस ऑफिस असिस्टंट परीक्षेचा निकाल जाहीर
आयबीपीएस

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आज प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (आरआरबी) सीआरपी आरआरबी रिक्रूटमेंट ऑफिस असिस्टंट या पदावर भरतीसाठी प्रारंभिक परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केलाय. निकाल अधिकृत वेबसाईट आयबीपीएसवर जाहीर केलेत. याचा निकाल 27 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध होईल. उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे निकाल तपासू शकतात. (IBPS Office Assistant Result 2020 To Be Released Today Evening At IBPS)

ऑफिस असिस्टंटपदासाठी प्राथमिक ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवारच मुख्य परीक्षेत सहभागी होऊ शकतील. मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये कार्यालयीन सहाय्यक पदावर पात्र उमेदवारांची नेमणूक केली जाईल.

उमेदवार त्यांचा निकाल पाहण्यास सक्षम असतील

– आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ‘Direct Link To Check IBPS Office Assistant Prelims Results 2020 ऑफिस असिस्टंटवर स्क्रोलिंग करून क्लिक करा.
– ओपन वेबपृष्ठावर आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
– आता निकालाचे प्रिंटआउट घ्या किंवा संगणकावर सेव्ह करा.

संबंधित बातम्या

IBPS Clerk 2019 recruitment : 12074 पदांसाठी नॉटीफिकेशन, अर्ज कसा कराल?

IBPS Office Assistant Result 2020 To Be Released Today Evening At IBPS