IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये

अधिकृत अधिसूचनेनुसार, हा करार तीन वर्षांसाठी असेल आणि दरवर्षी त्याचा आढावा घेतला जाईल. या नोकरीबद्दल अधिक माहिती जसे की पात्रता, पदांचे वर्णन, पगार इत्यादी माहिती पुढे देण्यात आलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:27 AM, 23 Feb 2021
IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये
doctor vacancy

नवी दिल्लीः आयडीबीआय वैद्यकीय पदवी असलेल्या उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (IDBI) वैद्यकीय अधिकारी (BMO) यांच्या पदांसाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविलेत. या प्रक्रियेंतर्गत नेमणुका अर्धवेळ आणि कराराच्या आधारे केल्या जातील. अधिकृत अधिसूचनेनुसार, हा करार तीन वर्षांसाठी असेल आणि दरवर्षी त्याचा आढावा घेतला जाईल. या नोकरीबद्दल अधिक माहिती जसे की पात्रता, पदांचे वर्णन, पगार इत्यादी माहिती पुढे देण्यात आलीय. (Idbi Recruitment 2021 Appointment Of Part Time Medical Officer Apply Before 24)

पदांचे वर्णन

एकूण पोस्ट – 23
मुंबई – 8
कोलकाता – 3
चंदीगड – 1
भुवनेश्वर – 1
अहमदाबाद – 1
भोपाळ – 1
नवी दिल्ली – 2
बंगळुरू – 1
पुणे – 1
हैदराबाद – 2
लखनऊ – 1
नागपूर – 1

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता

अ‍ॅलोपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसिनमध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयातून उमेदवाराकडे एमबीबीएस/एमडी असणे आवश्यक आहे.

अनुभव

एमबीबीएस आणि एमडी पदवी असणाऱ्या उमेदवारांना अनुक्रमे कमाल 5 वर्ष आणि किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.

पगार

निवडलेल्या उमेदवाराला तासाला 1000 रुपये दिले जातील. यासह प्रवासी भत्ता दरमहा 2000 रुपये आणि कंपाऊंडर फी म्हणून दरमहा 1000 रुपये देण्यात येतील.

निवड प्रक्रिया

बायोडेटाच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख – 12 फेब्रुवारी 2021
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2021

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) विविध मंडळांतर्गत असलेल्या शाखेत सर्बोडिनेट केडरमधील शिपायांच्या पदांवर भरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. बँकेच्या विविध मंडळांच्या कार्यालयाद्वारे जाहीर केलेल्या वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून मंडळाच्या अंतर्गत शाखांमधील शिपायांच्या एकूण 111 रिक्त पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या मंडळांमध्ये पीएनबी शिपाई भरती 2021 च्या जाहिराती देण्यात आल्या आहेत, त्यात सूरत सर्कल, बंगळुरू पूर्व सर्कल, बंगळुरू पश्चिम सर्कल, बालासोर सर्कल, चेन्नई सर्कल आणि हरियाणा सर्कल यांचा समावेश आहे.

IOCL अंतर्गत एकूण 346 पदांची भरती

IOCL Recruitment 2021: जर आपण एखादी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ((Indian Oil Corporation Limited, IOCL) ने अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. IOCL अंतर्गत एकूण 346 पदांची भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL https://iocl.com/ च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याच वेळी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

संबंधित बातम्या

Supreme Court Jobs: सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; 44,900 रुपये पगार

CCL Recruitment 2021: सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 482 पदांची भरती; थेट गुणवत्तेच्या आधारे निवड

Idbi Recruitment 2021 Appointment Of Part Time Medical Officer Apply Before 24