IFFCO MT Recruitment 2021: इफ्कोमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीसाठी भरती, 28 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज

अद्याप अर्ज न केलेले उमेदवार IFFCO च्या अधिकृत वेबसाईट iffco.in या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:05 AM, 27 Feb 2021
IFFCO MT Recruitment 2021: इफ्कोमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीसाठी भरती, 28 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज
पुढील काही महिन्यातं एचसीएल ही कंपनी 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

नवी दिल्लीः IFFCO MT Recruitment 2021: इफ्कोमध्ये नोकरीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. इफ्कोनं मॅनेजमेंट ट्रेनी भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. ही एक भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे आणि संपूर्णपणे भारतीय सहकारी संघाच्या मालकीची आहे. या पदासाठी अर्ज 28 फेब्रुवारी 2021 नंतर केलेले अर्ज कालबाह्य होणार आहेत. अद्याप अर्ज न केलेले उमेदवार IFFCO च्या अधिकृत वेबसाईट iffco.in या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. (Iffco Mt Recruitment 2021 Application Closing On February 28 Apply Online At Iffco)

पात्रतेचे निकष जाणून घ्या

ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून वाणिज्य विषयात बॅचलर डिग्री उत्तीर्ण केली असेल, त्यांना ही नोकरी मिळवण्याची संधी आहे. सनदी लेखाकार असतील त्यांनी इफ्को भरती 2021 अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त आणि लेखा) पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच 1 मार्च 2021 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये 5 वर्षे सवलत देण्याची तरतूद आहे.

अर्ज कसा करावा

अर्जासाठी उमेदवाराने इफ्कोच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल आणि नंतर मॅनेजमेंट ट्रेनीच्या लिंकवर क्लिक करा. या भरतीनंतर पीडीएफ स्वरूपात जाहिरात उघडली जाईल. ऑनलाईन अर्जाचा फॉर्म अधिसूचनेतच देण्यात आला आहे. उमेदवार उपरोक्त दिलेल्या थेट संकेतस्थळावरून अर्ज पृष्ठास भेट देऊ शकतात.

वेतनश्रेणीनुसार 55000 ते 130000 रुपये दिले जाणार

इफ्को येथे मॅनेजमेंट ट्रेनी (वित्त व लेखा) पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला कंपनीने निश्चित केलेल्या वेतनश्रेणीनुसार 55000 ते 130000 रुपये दिले जातील. या पदासाठी निर्धारित सीटीसी दर वर्षी 15 लाख आहे. याशिवाय अन्य भत्ते आणि लाभ देण्यात येतील. निवडलेल्या उमेदवाराला एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, त्याला दरमहा 50000 रुपये वेतन दिले जाईल.

संबंधित बातम्या

SHSB NHM Recruitment 2021: लॅब टेक्निशियनसाठी लवकरच करा अर्ज; गुणवत्तेच्या आधारे निवड

Government Job: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1 लाख रुपये

Iffco Mt Recruitment 2021 Application Closing On February 28 Apply Online At Iffco