भारतात यंदा महिलांना मिळणार सगळ्यात जास्त नोकऱ्या, कारण…

भारतात यंदा महिलांना मिळणार सगळ्यात जास्त नोकऱ्या, कारण...

तंत्रज्ञानाची मागणी वाढल्यामुळे तरुणांचा रोजगारही घटला आहे. पण डिजिटल क्रांतीमुळे महिलांच्या रोजगारामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Feb 20, 2021 | 3:37 PM

नवी दिल्ली : महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या जीवघेण्या काळामुळे आता नोकरी मिळणं मोठं कठीण झालं आहे. अशात आता तंत्रज्ञानाची मागणी वाढल्यामुळे तरुणांचा रोजगारही घटला आहे. पण डिजिटल क्रांतीमुळे महिलांच्या रोजगारामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे महिला रोजगारासाठी आता पहिलं प्राधान्य दिलं जात आहे. कारण, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त रोजगार मिळतो असा रोपोर्टच इंडिया स्किल्स रिपोर्ट 2021 (Skills Report 2021) मध्ये समोर आला आहे. (In India women will get the most jobs this year report by skills report 2021)

महिलांसाठी जास्त नोकऱ्या

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पदवीधरांपैकी फक्त 45.9 टक्के नोकरीसाठी पात्र आहेत. ही आकडेवारी गेल्या तीन वर्षातली सगळ्यात कमी आकडेवारी आहे. हीच 2019-20 मध्ये 46.21 टक्के, 2018-19 मध्ये 47.38 टक्के होती. पण आता मात्र चार ते तीन टक्क्यांची घट झाली आहे. अहवालानुसार 45.9 टक्के पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोजगार क्षमता 46.8 टक्के आहे.

भारतामध्ये नोकरीसाठी महिलांना पहिली पसंती दिली जात आहे. भारतातील महिलांच्या पात्र आणि रोजगारक्षम मानव संसाधनांची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतीय कंपन्या यावर्षी अधिक महिला कर्मचारी भरती करू शकतात.

या शहरांमध्ये सगळ्यात अधिक रोजगार महिलांना मिळणार…

अहवालानुसार, महाराष्ट्र, तामिलनाडु आणि उत्तर प्रदेशमध्यये महिलांना रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. अधिक माहितीनुसार, हा रिपोर्ट व्हीबॉक्सकडून सीआयआय (CII), एआयसीटीय (AICTE), एआययू (AIU) आणि यूएनडीपी (UNDP) यांच्यासोबत सहमताने तयार करण्यात आला आहे. या अहवालात तब्बल 65,000 उमेदवारांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. (In India women will get the most jobs this year report by skills report 2021)

संबंधित बातम्या – 

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; आजच अर्ज करा आणि मिळवा नोकरी

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 10 वी आणि 12 वीच्या गुणांच्या आधारे निवड

Government Job : भारतीय नौदलाकडून 1159 पदांवर भरती, असं करा अप्लाय

(In India women will get the most jobs this year report by skills report 2021)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें