नवी दिल्लीः Indian Army Bharti 2021: भारतीय सैन्यात भरतीची (Indian Army Recruitment) इच्छा असल्यास ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारताच्या सुपुत्रांना भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्याने मेगा भरती काढलीय. भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये 17 ते 28 मे 2021 दरम्यान सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीर (UT) येथे आयोजित केली जाणार आहे. (Indian Army Bharti 2021: Golden Opportunity for Indian Army Recruitment, Applications for 8th to 12th Pass)
भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीरसाठी एखादी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. या भरती रॅलीच्या संपूर्ण माहितीसाठी आपण खाली दिलेल्या सूचनेच्या थेट लिंकला भेट देखील देऊ शकता.
सैन्य भरती रॅली 2021 चं आयोजन: 17 मे ते 28 मे 2021 पर्यंत करा अर्ज
ऑनलाईन अर्जः 02 एप्रिल ते 01 मे 2021 पर्यंत अर्ज करता येणार
प्रवेश पत्र देण्याची अपेक्षित तारीखः 2 मे ते 15 मे 2021
1. सोल्जर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स)
2. सोल्जर टेक्निकल
3. सोल्जर नर्सिंग असिस्टेंट(एएमसी)
4. सोल्डर लिपिक किंवा स्टोअर कीपर टेक्निकल
5. सोल्जर ट्रेड्समॅन ((ऑल आर्म्स) 8 वा पास
6. सोल्जर ट्रेड्समॅन (ऑल आर्म्स) 10 वी पास
सोल्जर जनरल ड्युटी (जीडी) – 45% गुणांसह 10 वी पास
सैनिक टेक्निकल – विज्ञान शाखेत 50% गुणांसह 12 वी पास ज्यामध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी विषय असावेत.
सैनिक नर्सिंग सहाय्यक (एएमसी) – विज्ञान प्रवाहात 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण. इंटरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी, जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र केलेले असावे.
सोल्डर लिपिक किंवा स्टोअर कीपर टेक्निकल – किमान 60 टक्के गुणांसह 12 वी पास असणं आवश्यक
सैनिक ट्रेड्समॅन(ऑल आर्म्स) 8 वी पास – उत्तीर्ण गुणांसह 8 वी पास उमेदवार (33%) अर्ज करू शकतात.
सैनिक ट्रेड्समॅन (ऑल आर्म्स) दहावी पास – दहावी (मॅट्रिक) पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
सैनिक जीडीसाठी वय 17 वर्ष ते साडेसहा ते 21 वर्ष असावे (जन्म 1 ऑक्टोबर 2000 आणि 1 एप्रिल 2004 दरम्यान झालेला असावा). त्याचबरोबर इतर सर्व पदांच्या उमेदवारांची वयोमर्यादा 17 वर्षे ते 23 वर्षे (1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान जन्मलेली) असावी.
सैन्य भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार जम्मू-काश्मीर, श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला, पुलवामा, बुडगाम, कुपवाडा, सोपियान, गांदरबल, बांदीपोरा आणि कुलगाम या 10 जिल्ह्यांमध्ये भारतीय सैन्य भरती रॅली आयोजित केली जाईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी), शारीरिक मापन चाचणी (पीएमटी) आणि लेखी परीक्षा (सीसीई) च्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्जदारांची प्रवेश पत्रे ई-मेलवर पाठविली जातील.
संबंधित बातम्या
पंजाब नॅशनल बँकेत सफाई कामगारांची भरती; अशिक्षित बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी
Indian Army Bharti 2021: Golden Opportunity for Indian Army Recruitment, Applications for 8th to 12th Pass