सारं विश्व हिंदी शिकणार, परदेशी नागरिकांना फुकटात शिकवणार हिंदी, भारतीय दूतावासाचा अभिनव उपक्रम

16 जानेवारी 2020 पासून या कोर्सला सुरुवात होणार आहे.

सारं विश्व हिंदी शिकणार, परदेशी नागरिकांना फुकटात शिकवणार हिंदी, भारतीय दूतावासाचा अभिनव उपक्रम
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 2:09 PM

नवी दिल्ली : हिंदी भाषा (Hindi Language) वाढवण्यासाठी भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. हिंदी भाषा शिकण्यासाठी तसेच भारताच्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या अशाच उत्सुक आणि हिंदीबद्दल जाणून घेण्यासाठी जिज्ञासू परदेशी नागरिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अमेरिकी आणि परदेशी नागरिकांसाठी हो कोर्स असणार आहे. विशेष म्हणजे हा कोर्स विनाशुल्क अर्थात फुकटात शिकवण्यात येणार आहे. Indian embassy will teach Hindi for foreign citizens for free

या कोर्सची सुरुवात नववर्षापासून होणार आहे. 16 जानेवारी 2020 पासून या कोर्सला सुरुवात होणार आहे. भारतीय दुतावासात हा कोर्स शिकवण्यात येणार आहे. संस्कृतीचे शिक्षक मोक्षराज हे हिंदी शिकवणार आहेत. याबाबतची माहिती दुतावासाने एका निवेदनात दिली आहे.

मोक्षराज यांचं मत काय?

मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताबद्दल योग्य आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी ही लोकं हिंदी शिकण्यासाठी इच्छूक असल्याची प्रतिक्रिया मोक्षराज यांनी दिली. मोक्षराज हे वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासामध्ये नियुक्त केलेले पहिले सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने त्यांची येथे भारतीय संस्कृती शिक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

काय काय शिकवलं जाणार?

या मोफत असलेल्या कोर्समध्ये अनेक विषयांबाबत शिकवलं जाणार आहे. यामध्ये कला-संस्कृती, कुटुंब व्यवस्था, विवाह पद्धती, वास्तुकला, हिंदी सिनेमा, योग-ध्यान, पाककला आणि राजकारण यासारखे विषयांची माहिती देण्यात येणार आहे. परदेशातील नागरिकांमध्ये हिंदीबाबत कुतुहल निर्माण झालं आहे. यामुळे दुतावासात हे सर्व विषय शिकवण्यात येणार आहेत. अमेरिकेत हिंदीबाबतची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय.

भारतीय दूतावास गेल्या 2 वर्षांपासून विविध देशांमधील लोकांना हिंदी शिकवण्यासाठी या मोफत कोर्सचं आयोजन करतंय. तसंच जॉर्ज वॉशिंग्टन आणि जॉर्जटाउन या विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित अमेरिकन उच्च शिक्षण केंद्रांशीही भागीदारी केली आहे.

अमेरिकेमध्ये मुळचे भारतीय असलेले अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. या भारतीय नागरिकांकडून अमेरिकेत विविध हिंदी भाषेसंबंधित कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाद्वारे हिंदीची लोकप्रियता वाढीस लागली आहे.

मोक्षराज यांचं हिंदीसाठी महत्वाचं योगदान

मोक्षराज यांनी विदेशात अनेक ठिकाणी अनेक विषय शिकवले आहेत. मोक्षराज यांनी आतापर्यंत वॉशिंग्टन डीसी, व्हर्जिनिया, मेरीलँड, वेस्ट व्हर्जिनियन आणि केंटकी अशा बर्‍याच ठिकाणी हिंदी, भारतीय संस्कृती, योग आणि संस्कृतीविषयीचे धडे दिले आहेत. भारतीय दुतावासात 2018 आणि 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवसांचं आयोजन केलं होतं. या योगा दिवसाच्या कार्यक्रमांचं आयोजन मोक्षराज यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

New Education Policy | केमिस्ट्रीसोबत संगीत, फिजिक्ससोबत फॅशन डिझायनिंग विषय शिकण्याची संधी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवं शैक्षणिक धोरण

Indian embassy will teach Hindi for foreign citizens for free

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.