Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात अधिकारी पदावर संधी, अर्ज कुठे करायचा?

भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ज्वॉइन इंडियन नेव्ही तर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात अधिकारी पदावर संधी, अर्ज कुठे करायचा?
भारतीय नौदल
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 10:44 AM

Indian Navy Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ज्वॉइन इंडियन नेव्ही तर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यानुसार 50 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार अर्ज करु इच्छितात ते इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात. (Indian Navy Recruitment 2021 for Short Service Officer Post know details here)

शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC officer) या पदासांठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2021 पासून सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 26 जून 2021 ही आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करायचा असल्यास joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावे. अर्ज भरताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करु नये, अन्यथा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

अर्ज कसा दाखल करायचा

स्टेप:1 जॉऊन इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट द्या. स्टेप:2 वेबसाईटवरील करियर अँड जॉब्स ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप:3 अब एक्झ्यूक्यूटिव्ह ऑप्शन वर क्लिक करा. स्टेप:4 तिथे Register with Aadhaar Virtual ID वर क्लिक करा. स्टेप:5 आता नोंदणीमधील सर्व माहिती भरा. स्टेप:6 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज दाखल करा. स्टेप:7 जॉईन इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा.

पदांची संख्या

भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 50 पदांवर भरती होणार आहे. इंडियन नेव्हीच्या एक्झ्यूक्युटिव्ह ब्रांचमध्ये भरती केली जात आहे. (Indian Navy Recruitment 2021) नुसार जनरल सर्व्हिससाठी 47 जागा तर हायड्रो केडर पदासाठी 3 जागांवर भरती होईल.

पात्रता आणि वयोमर्यादा

भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार केवळ पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई किंवा बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मात्र, उमेदवारांनी 60 टक्के गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

हेही वाचा: 

ह्रदयद्रावक Video, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत, ‘लातूर पॅटर्न’ तरुणीची आत्महत्या

पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर

(Indian Navy Recruitment 2021 for Short Service Officer Post know details here)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.