JEE Main Result 2021: JEE मेन निकाल जाहीर, 6 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण, महाराष्ट्रातील एक टॉपर

विशेष म्हणजे 100 एनटीए स्कोअर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:47 PM, 8 Mar 2021
JEE Main Result 2021: JEE मेन निकाल जाहीर, 6 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण, महाराष्ट्रातील एक टॉपर

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा 2021 (JEE Main Result 2021) च्या फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर केलाय. जेईई मेन फेब्रुवारी 2021 च्या सत्रात 6 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवलेत, तर 41 विद्यार्थी टॉपर्सच्या यादीत आहेत. विशेष म्हणजे 100 एनटीए स्कोअर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. (JEE Main results announced, 6 students get 100 NTA marks, a topper from Maharashtra)

महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जीने मिळवले 100 एनटीए गुण

महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जी, राजस्थानातील साकेत झा, दिल्लीचा प्रवर कटारिया, दिल्लीचा रणजिम दास, चंदीगडचा गुरमरित सिंग, गुजरातचा अनंत किदंबी या सहा विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवलेत.

या परीक्षेला जवळपास 95 टक्के विद्यार्थी बसले होते

या परीक्षेला जवळपास 95 टक्के विद्यार्थी बसले होते. 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्यांदाच तब्बल 13 भाषांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळ्म, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, गुजराती या भाषांचा समावेश होता.

जेईई मेन परीक्षेनंतर काय, तेही जाणून घ्या

जर आपण टॉप 2,50,000 उमेदवारांपैकी असाल तर आपल्याला जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी बसण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की, परीक्षा आणखी तीन सत्रांमध्ये घेण्यात येईल. या सत्रांमध्ये आपण आपली गुणवत्ता सुधारू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरुवातीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवता आले नाही तर तुम्ही दुसर्‍या परीक्षेत बसून चांगले गुण मिळवू शकता. एनटीएकडून आपल्याला देण्यात आलेल्या तीन सत्रांपैकी ज्या सत्रात सर्वाधिक गुण असतील, त्या सत्राचा विचार केला जाईल. त्या सर्वाधिक गुणांच्या साहाय्याने रँक लिस्ट तयार केली जाईल.

मार्च सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण

मार्च सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मार्चमध्ये जेईई मेन फेज -2 परीक्षा 15, 16, 17 आणि 18 मार्च रोजी होईल. या परीक्षेचे प्रवेश पत्र लवकरच जारी केले जाईल. जेईई मेन परीक्षेचे प्रवेश पत्र (अ‍ॅडमिट कार्ड) अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येऊ शकते. उमेदवारांना आपला निकाल पाहण्यासाठी लॉग इन करावे लागेल.

संबंधित बातम्या

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल

JEE Main results announced, 6 students get 100 NTA marks, a topper from Maharashtra