NHRC Recruitment 2021: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात बंपर भरती; ‘असा’ करा अर्ज

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:44 AM, 27 Jan 2021
NHRC Recruitment 2021: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात बंपर भरती; 'असा' करा अर्ज
PPSC JE Recruitment 2021

नवी दिल्लीः NHRC Recruitment 2021: आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची असू शकते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात (NHRC) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. यात स्टेनोग्राफर, संशोधन सहाय्यक, सहाय्यक ग्रंथालय, कर्मचारी, कार चालक, वरिष्ठ अधीक्षक, ट्रान्सलेटर आणि इतर पदांचा समावेश आहे. त्याअंतर्गत एकूण 26 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज करताना अधिसूचना चांगल्या प्रकारे वाचून घ्यावी, जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही त्रुटी होणार नाही. (Job NHRC Recruitment 2021 National Human Rights Commission Nhrc Has Invited Applications For The Other posts Get Here Full Details)

भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांची माहिती
स्पेशलिस्ट ग्रेड- II 01, सिस्टम एनॉलिस्ट 01, हेल्थ एज्युकेशन ऑफिसर, सायकोलॉजिस्ट 01, सिस्टम एनालिस्ट 01 पद, सीनियर पोलीस अधीक्षक 03 पदं, असिस्टंट रजिस्ट्रार 04 पदं, रिसर्च ऑफिसर 03 पदं, सेक्शन ऑफिसर 01 पद, सीनियर ट्रान्सलेटर (हिंदी) 01 पद, रिसर्च असिस्टंट 02 पदं, ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी) 01, स्टेनो ग्रेड डी 09 पद, असिस्टंट लाइब्रेरियन 01 पद, स्टाफ कार ड्राइव्हर 01 पदांची भरती केली जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) काढलेल्या भरतीसाठी संशोधन सहाय्यक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक ग्रंथपाल, संशोधन अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, कर्मचारी कारचालक, वरिष्ठ अधीक्षक अशा विविध पदांवर अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील अर्ज करू शकतात.

NHRC Recruitment 2021: असा मिळेल पगार

वरिष्ठ अधीक्षक – 123100 ते 215900 रुपये
सहाय्यक निबंधक – 67700 ते 208700 रुपये
संशोधन अधिकारी – 5610 ते 177500 रुपये
विभाग अधिकारी – 47600 ते 151100 रुपये
वरिष्ठ अनुवादक – 44900 ते 14200 रुपये
संशोधन सहाय्यक- 35400 ते 11240 रुपये
कनिष्ठ अनुवादक – 35400 ते 112400 रुपये
स्टेनो ग्रेड – 25500 ते 81100 रुपये
सहाय्यक ग्रंथपाल – 25500 ते 81100 रुपये

संबंधित बातम्या

WBHRB Recruitment 2021: WBHRB ने 1647 पदांवर काढली भरती; 28,900 रुपये पगार

Special Story| Government Job 2021 : आठवी पासना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ विभागांत मिळतोय 90 हजारांपर्यंत पगार

Job NHRC Recruitment 2021 National Human Rights Commission Nhrc Has Invited Applications For The Other posts Get Here Full Details