आघाडीच्या ‘या’ 5 IT कंपन्या कोरोनात बेरोजगारांना देणार मोठा दिलासा, 1 लाखांहून अधिक भरती करणार

विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही देशातल्या 5 दिग्गज आयटी कंपन्या (IT companies) 1 लाखांहून अधिक जणांना रोजगार देणार आहे. TCS Wipro Infosys HCL Tech Mahindra

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:18 PM, 20 Apr 2021
आघाडीच्या 'या' 5 IT कंपन्या कोरोनात बेरोजगारांना देणार मोठा दिलासा, 1 लाखांहून अधिक भरती करणार
TCS Wipro Infosys HCL Tech Mahindra

नवी दिल्लीः देशावर कोरोनाचं मोठं संकट आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयंकर असून, अनेक जण मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित होत आहेत. देशात लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती (Corona Lockdown) आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकरीचं टेन्शन आहे. तर काहींना पगार कपातीची भीती आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही देशातल्या 5 दिग्गज आयटी कंपन्या (IT companies) 1 लाखांहून अधिक जणांना रोजगार देणार आहे. (Leading 5 IT companies to give more relief to unemployed in Corona, to recruit more than 1 lakh)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नोकरीचे संकट अधिक गडद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नोकरीचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे नोकरदार लोकांनाही नोकरी टिकवून ठेवण्याची चिंता सतावतेय, परंतु अडचणीच्या काळात देशातील पहिल्या 5 कंपन्या मोठा दिलासा देऊ शकतात. खरं तर भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्या लवकरच 1 लाखांहून अधिक भरती करणार आहेत. यात आयटी क्षेत्रातील हुशार तरुणांना मोठी संधी मिळू शकेल.

या बंपर हायरिंगद्वारे लाखो तरुणांना रोजगार मिळणार

या वर्षाच्या सर्वात मोठ्या भरतींपैकी ही एक भरती असेल, असा विश्वास आहे. या बंपर हायरिंगद्वारे लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात चांगल्या टॅलेंटची मागणी वाढल्यामुळे आयटी कंपन्या या नोकरभरती करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूमधून सुमारे 40,000 नोकरभरती करेल. त्याचबरोबर इन्फोसिस कॅम्पस इंटरव्ह्यूमधून 25000 जणांची भरती करण्याची शक्यता आहे.

विप्रो कंपनीही पूर्वीच्या तुलनेत जास्त नोकरभरती करणार

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, विप्रो कंपनीही पूर्वीच्या तुलनेत जास्त नोकरभरती करणार आहे. नोकरभरतीची संख्या कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल आणि टेक महिंद्रा यंदा 1,10,000 हून अधिक भरती करणार आहेत, याच कंपन्यांनी गेल्या वर्षी 90000 पेक्षा जास्त भरती केली आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम हलविण्याची तयारी

कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशातील कामकाजाचा दिनक्रम बदलला आहे. गेल्या वर्षापासून बहुतांश कंपन्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. कोरोना काळानुसार वाढती मागणी पाहता बर्‍याच कंपन्या आणि ग्राहक आपला व्यवसाय ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हलविण्याच्या तयारीत आहेत.

20 टक्के अधिक होणार नोकरभरती

तज्ज्ञांच्या मते, या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन योजना तयार केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हायरिंग 20 टक्क्यांहून अधिक असेल. यासाठी भारताच्या पहिल्या पाच आउटसोर्सर्सनी गेल्या वर्षी एकूण 2.10 लाख नोकरभरती केल्या. यावेळी हा आकडा अधिक असेल. Leading 5 IT companies to give more relief to unemployed in Corona, to recruit more than 1 lakh

संबंधित बातम्या

कोरोना संकटातही चांगली बातमी! ही आयटी कंपनी यंदा कॅम्पसमधून 25 हजार नोकऱ्या देणार

Mega Job recruitment in TCS, Wipro, Infosys, HCL and Tech Mahindra company