MAHADISCOM Recruitment 2021: राज्यात विद्युत सहाय्यकाच्या 5000 पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा

MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:43 AM, 25 Feb 2021
MAHADISCOM Recruitment 2021: राज्यात विद्युत सहाय्यकाच्या 5000 पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा
MAHADISCOM Recruitment 2021

मुंबईः MAHADISCOM Recruitment 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MAHADISCOM) यांनी विद्युत सहाय्यक पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 5000 हजार पदे भरली जाणार आहेत. अशा परिस्थितीत, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. (MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 5000 posts of Electrical Assistants in the State; Apply now)

MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व तपशील वाचावेत.

एकूण 5 हजार पदांवर भरती

अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नकारला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, एक्स सर्व्हिसमॅन 750, प्रोजेक्टड 250, भूकंपग्रस्त 99, लर्नर उमेदवारांच्या 500 पदांसाठी 5 हजार पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 5000 posts of Electrical Assistants in the State; Apply now

शैक्षणिक पात्रता काय?

MAHADISCOM ने जारी केलेले अधिसूचना, विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वीची परीक्षा आणि राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र (NTTC) असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. या व्यतिरिक्त भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी भरती

याखेरीज दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी नुकतीच भरती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 1145 शिक्षकेतर पदे नियुक्त केली जातील. अशा परिस्थितीत या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनटीएद्वारे डीयू नॉन टीचिंग रिक्रूटमेंट 2021 पोर्टल recruitment.nta.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 16 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

संबंधित बातम्या

IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये

UCIL Recruitment 2021: 47 जागांवर बंपर भरती, शासकीय नोकरीसाठी करा अर्ज

MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 5000 posts of Electrical Assistants in the State; Apply now