Maharashtra Health Department Recruitment 2021 : तंत्रज्ञ ते आरोग्य सेवक, तातडीने भरली जाणारी 10 हजार पदं नेमकी कोणती?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. Maharashtra health department recruitment 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:29 PM, 16 Apr 2021
Maharashtra Health Department Recruitment 2021 : तंत्रज्ञ ते आरोग्य सेवक, तातडीने भरली जाणारी 10 हजार पदं नेमकी कोणती?
NHM Ratnagiri Recruitment 2021

मुंबईः कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. (Maharashtra health department recruitment 2021: From technicians to health workers, what exactly are the 10,000 posts to be filled immediately?)

आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरणार

राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरतीबाबत प्रस्ताव सादर केला. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी

राज्यात कोरोना करोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10, 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू

कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार 127 पदे भरण्याबाबत चा प्रस्ताव ग्राम विभाग ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल.

संबंधित बातम्या

चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

Maharashtra health department recruitment 2021: From technicians to health workers, what exactly are the 10,000 posts to be filled immediately?