Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रोमध्ये 96 पदांसाठी भरती, 50 हजार ते 2 लाखापर्यंत पगाराची संधी

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया Mahametro.org वर सुरू झाली आहे.

Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रोमध्ये 96 पदांसाठी भरती, 50 हजार ते  2 लाखापर्यंत पगाराची संधी
MAHA Metro Recruitment


Metro Recruitment 2021 मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं विविध पदांसाठी जाहिरात दिली आहे. मेट्रोमध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप, महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि खाते सहाय्यक या पदांसाठी भरती करणार आहे. विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. एकूण 96 पदं भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया Mahametro.org वर सुरू झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 96 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा ?

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 1 पद
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 1 पद
उपमहाव्यवस्थापक – 1 पद
सहाय्यक व्यवस्थापक – 1 पद
सीनियर स्टेशन कंट्रोलर/ट्रॅफिक कंट्रोलर/डेपो कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर (सीनियर स्टेशन कंट्रोलर)- 23 पदे
वरिष्ठ विभाग अभियंता – 3 पदे
विभाग अभियंता – 1 पद
कनिष्ठ अभियंता – 18 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ – 43 पदे
अकाऊंट सहाय्यक – 4 पदे

पदांनुसार पात्रता

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये BE, B.Tech असणे आवश्यक आहे. अकाऊंट सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बी.कॉम पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानातील बी.टेक किंवा बीई पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक- 53 वर्षे

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक-48 वर्षे

उपमहाव्यवस्थापक- 45 वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक- 35 वर्षे

वरिष्ठ स्टेशन कंट्रोलर/ट्रॅफिक कंट्रोलर/डेपो कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर- UR- 40 वर्षे, OBC- 43 वर्षे, SC/ST- 45 वर्षे

वरिष्ठ विभाग अभियंता – 40 वर्षे

विभाग अभियंता – 40 वर्षे

कनिष्ठ अभियंता – 40 वर्षे

वरिष्ठ तंत्रज्ञ- 40 वर्षे

खाते सहाय्यक- 32 वर्षे

पगाराचा तपशील

या रिक्त जागेत (मेट्रो भरती 2021), अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 1,00,000 ते 2,60,000 रुपये प्रति महिना, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000 ते 2,20,000 रुपये प्रति महिना, उपमहाव्यवस्थापक – 70,000 ते 2,00,000 रुपये महिना आणि सहाय्यक व्यवस्थापक पगार दरमहा 50,000 ते 1,60,000 मिळतील.

इतर बातम्या:

Maharashtra Health Dept Exam Date Update: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

परीक्षार्थींना दिलासा, आता ‘या’ तारखांना आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता, राजेश टोपेंनी दिली माहिती

Maharashtra Metro Recruitment 2021 for Various Post know how to apply

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI