नांदेडच्या तरुणाची कमाल, सुरक्षा रक्षक म्हणून 7 वर्ष काम, PSI पदाला जिद्द आणि सातत्याच्या जोरावर गवसणी

नांदेडच्या तरुणाची कमाल, सुरक्षा रक्षक म्हणून 7 वर्ष काम, PSI पदाला जिद्द आणि सातत्याच्या जोरावर गवसणी
गोपीनाथ केंद्रे
Image Credit source: TV9

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माळाकोळी गावातील गोपीनाथ केंद्रे (Gopinath Kendre) या तरुणाची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे. गोपीनाथ यांनी अनेक आव्हानांना तोंड देत घरची परिस्थिती हलाकीची असताना हे यश संपादन केलंय.

प्रशांत चालिंद्रवार

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 16, 2022 | 8:04 PM

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माळाकोळी गावातील गोपीनाथ केंद्रे (Gopinath Kendre) या तरुणाची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे. गोपीनाथ यांनी अनेक आव्हानांना तोंड देत घरची परिस्थिती हलाकीची असताना हे यश संपादन केलंय. गोपीनाथ यांनी मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम केलंय सात वर्षे कष्ट करून, अभ्यास करत 2019 ची परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळवलं. त्याचा निकाल 8 मार्च 2022 रोजी जाहीर झाला. महाराष्ट्रात त्यांचा 32वा क्रमांक आहे. मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्याने आईवडिलांना आनंद झाला आहे.गोपीनाथ केंद्रे हे नांदेड जिल्ह्यातील माळाकुळी गावातील आहेत.गावात प्राथमिक आणि माध्यमकि शिक्षण घेऊन महाविद्यालयीनं शिक्षणासाठी पुण्यात आले. सुरक्षा रक्षकाचं काम करत करत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.

मित्रांची साथ लाभली

महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. अभ्यास करत असताना आर्थिक अडचणींमुळं गोपीनाथ यांनी मुंबईत सुरक्षा रक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत करत अभ्यास केला, आता त्या अभ्यासाचं फळ मिळाला. ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी कोणी विचारत नव्हतं. आता, निकाल लागल्यानंतर सर्व जण अभिनंदन करतात, असं गोपीनाथ केंद्रे यांनी सांगितलं. मला मिळालेल्या यशात आई, वडिल, पत्नी आणि मित्रांचं महत्त्वाचा वाटा असल्याचं गोपीनाथ केंद्रे म्हणाले. 2019 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

गोपीनाथ केंद्रे यांच्या यशाचा आई वडिलांना आनंद

किसन केंद्रे यांनी आम्ही रोजगार आणि नोकरी करत मुलांना आम्ही शिकवलं, आमचा मुलगा नोकरी लागणार असल्यानं आनंद वाटतो, असं म्हटलं.
शिक्षण हे गरजेचं आहे. सरकारी नोकरी मिळाल्यानं आता आनंद वाटतो. सणाच्या दिवशी आम्हाला कधी कधी खायला मिळत नव्हतं पण आता आनंद वाटतो. आता मुलं शिकत आहेत. आमच्या मोठ्या मुलानं गोपीनाथ याला शिक्षणासाठी पैसे दिले. आता नोकरी मिळणार आहे तर आनंद वाटतो, असं आशाबाई केंद्रे म्हणाल्या.

इतर बातम्या:

विरोधकांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’, Ajit Pawar यांचा टोला

अजितदादांच्या The Kashmir Filesवरील विधानानंतर विरोधकांचा सभात्याग, सत्ताधारी म्हणाले, ‘पळाले रे पळाले’


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें