BSF Recruitment 2021: BSF मध्ये बऱ्याच पदांवर भरती, सेवानिवृत्त अधिकारीसुद्धा करू शकतात अर्ज

बीएसएफने ग्रुप ए, बी आणि सी मधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती (BSF Recruitment 2021) जारी केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:05 PM, 2 Mar 2021
BSF Recruitment 2021: BSF मध्ये बऱ्याच पदांवर भरती, सेवानिवृत्त अधिकारीसुद्धा करू शकतात अर्ज
BSF Recruitment

नवी दिल्लीः देशाच्या सुरक्षा दलात नोकरी मिळवणे ही एक सन्मानाची बाब आहे. दरवर्षी लाखो तरुण सुरक्षा दलात नोकरीची तयारी करतात. अशा परिस्थितीत सीमा सुरक्षा दलाने जारी केलेल्या अधिसूचनेमुळे तरुणांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालीय. बीएसएफने ग्रुप ए, बी आणि सी मधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती (BSF Recruitment 2021) जारी केलीय. यात कॅप्टन/पायलट, इन्स्पेक्टर आणि गनर यासह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. (Recruitment For Many Posts In BSF, Even Retired Officers Can Apply)

ज्या उमेदवारांना सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या रिक्त जागांसाठी (BSF Recruitment 2021) एकूण 53 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आलाय. या रिक्त पदांबद्दलची खास गोष्ट म्हणजे सेवानिवृत्त उमेदवारदेखील त्यात अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) bsf.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. येथे भरती फोल्डरवरील संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. या रिक्त जागांसाठी अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आलीय.

या पदांवर भरती होणार

बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गट अ, ब आणि क मधील अनेक पदांसाठी स्वतंत्रपणे भरती केली जाणार आहे. यामध्ये कॅप्टन/पायलट (डीआयजी), कमांडंट (पायलट), उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विमान देखभाल अभियंता, कनिष्ठ विमान देखभाल अभियंता, उपकरण अधिकारी, निरीक्षक आणि गनर अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निश्चित केल्यात.

पगार किती असेल हे जाणून घ्या

कॅप्टन / पायलट (DIG) – 3.25 लाख ते 3.50 लाख रुपये
कमांडंट (Pilot) – 2.8 लाख ते 3.4 लाख रुपये
एसएएम – 1.40 लाख
जाम (SI) – 1.30 लाख रुपये
आम (ASI) – 1.20 लाख रुपये
फ्लाइट गनर – 1.55 लाख ते 1.65 लाख
फ्लाइट इंजिनियर (SI) आणि कनिष्ठ फ्लाइट गनर (JSI) – 1.5 लाख ते 1.55 लाख पगार

रिक्त जागांची माहिती

या रिक्त जागांनुसार एकूण 53 जागांवर भरती होईल. यात कॅप्टन / पायलट (DIG), कमांडंट (Pilot) साठी 06, एसएएम (Inspr) साठी 05, जॅम (SI) साठी 11, एएएम (ASI), फ्लाइट गनर (Inspr) साठी पदे असतील. फ्लाइट इंजिनियर (SI) च्या 04 जागांसाठी आणि फ्लाइट गनर (SI) यांच्या 04 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

BARC | भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये पदभरती, 78 हजारांपर्यंत पगार मिळणार

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

Recruitment For Many Posts In BSF, Even Retired Officers Can Apply