Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळं सोडा ! SBI क्लर्कचा आधी अर्ज भरा, आज शेवटची तारीख

SBI Clerk Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. एसबीआयमध्ये 13 हजारांहून अधिक पदांच्या लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा.

सगळं सोडा ! SBI क्लर्कचा आधी अर्ज भरा, आज शेवटची तारीख
SBI क्लर्कसाठी अर्ज करण्याची आज अखेरची मुदत
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 9:26 AM

SBI Clerk Recruitment 2025: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असून सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. तुम्हालाही स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये क्लर्क व्हायचे असेल तर घाई करा, अन्यथा संधी गमवावी लागेल. एसबीआयमध्ये 13 हजारांहून अधिक पदांच्या लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच 7 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी आहे. या भरतीतून एकूण 23 हजार 735 पदे भरण्यात येणार आहेत.

SBI Clerk Recruitment 2025: अर्ज कसा करावा?

• सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा sbi.co.in/web/careers/current-openings. • त्यानंतर ‘नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा’ हा टॅब निवडा. • त्यानंतर आपले नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आदी तपशील भरा. • आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार होईल. • त्यानंतर छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत आणि स्वाक्षरी अपलोड करा. • त्यानंतर वैयक्तिक तपशील, कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता इत्यादी प्रविष्ट करा. • आता एसबीआय क्लर्क अर्ज काळजीपूर्वक वाचा आणि तपशील सबमिट करा. • उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल आणि अर्ज सादर करावा लागेल. • आपल्या अर्जाची प्रिंटआऊट आणि ई-पावती घ्या.

SBI Clerk Recruitment 2025 ची शैक्षणिक पात्रता काय ?

एसबीआय क्लर्क भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवी आहे. इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री सर्टिफिकेट असलेले उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र त्यांना जॉईनिंग तारखेपूर्वी किंवा त्यापूर्वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

SBI Clerk Recruitment 2025 ची वयोमर्यादा काय ?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 पूर्वी आणि 1 एप्रिल 2004 नंतर झालेला असावा.

SBI Clerk Recruitment 2025 साठी अर्जाचे शुल्क किती ?

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क आहे. डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरता येईल.

अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला sbi.co.in. भेट देऊ शकता.

ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा.
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?.
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?.
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान.
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.