SBI बॅकेत सरकारी नोकरीची संधी! 600 पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज
SBI PO Recruitment 2024: तुम्ही सरकारी नोकरी मिळवू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओची बंपर रिक्त जागा समोर आल्या आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया झाली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे असावे.

SBI PO Recruitment 2024: सरकारी नोकरी शोधताय का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच पीओ पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 डिसेंबरपासून सुरू झाली असून 16 जानेवारीला संपेल. या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण 600 पदे भरण्यात येणार असून यामध्ये 586 नियमित पदे आणि 14 बॅकलॉग पदांचा समावेश आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, एसबीआय पीओसाठी पूर्व परीक्षा 8 आणि 15 मार्च रोजी घेण्यात येईल.
SBI PO Recruitment 2024: पात्रता निकष काय आहेत?
शैक्षणिक पात्रता: अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले इच्छुक उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 01.01.2018 रोजी 21 ते 30 वर्षे असावे. मात्र, नियमानुसार उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.




SBI PO Recruitment 2024: अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम एसबीआयच्या sbi.co.in. या अधिकृत संकेतस्थळावर जा
त्यानंतर होमपेजवरील SBI PO भरती 2024 लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज भरण्यासाठी आपल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करा.
आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
अर्ज केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा.
एसबीआय पीओ भर्ती 2024 अधिकृत अधिसूचना
SBI PO Recruitment 2024: अर्ज शुल्क काय आहे?
एसबीआय पीओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
SBI PO Recruitment 2024: परीक्षा पॅटर्न काय आहे?
एसबीआय पीओची निवड प्रीलिम्स, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी सह चार टप्प्यात केली जाईल. पूर्व परीक्षा 100 गुणांची असते. यामध्ये इंग्लिश लँग्वेजमधून 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडमधून 35 प्रश्न आणि रिझनिंग अॅबिलिटीमधून 35 प्रश्न विचारले जातात.
प्रीलिम्स उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेतील प्रश्न २५० गुणांचे असतात. यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
एसबीआय पीओ पगार: मला किती पगार मिळेल?
पीओ पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 48,480 रुपये बेसिक पगार मिळेल. एसबीआयच्या मुंबई केंद्रासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 18.67 लाख रुपये सुरुवातीचे वेतन मिळेल.