नवी दिल्लीः WBHRB Recruitment 2021: सरकारी नोकरीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगाल हेल्थ रिक्रूटमेंट बोर्डाने 1600 हून अधिक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवलेत. पश्चिम बंगाल स्वास्थ्य रिक्रूटमेंट बोर्डाने (WBHRB ) या भरतींतर्गत मेडिकल टेक्नोलॉजिस्ट ग्रेड थ्रीच्या 1647 पदांच्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट wbhrb.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Wbhrb Medical Technologist Recruitment 2021 Sarkari Naukri Latest Updates Govt Job Medical Vacancy)
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख- 28 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 फेब्रुवारी 2021
WBHRB Recruitment 2021 भरती अंतर्गत मेडिकल टेक्नोलॉजिस्ट ग्रेड थ्रीच्या 1647 पदांसाठी अर्ज करू शकता. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 28,900 प्रति महिना (बेसिक) पगार मिळणार आहे. WBHRB Medical Technologist Recruitment 2021 साठी अर्ज करणाऱ्यांचं वय 21 ते 39 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट मिळणार आहे.
एकूण पदं- 1647
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (लैब), जीआर- III – 633 पदं
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (ओटी), जीआर- III- 566 पदं
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (ईसीजी), GR-III – 281 पदं
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (क्रिटिकल केअर), जीआर- III – 164 पदं
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (पी अँड ओ), जीआर- III – 2 पदं
मेडिकल टेक्नोलॉजिस्ट (ईईजी/ईएमजी), जीआर- III – एक पद
WBHRB Recruitment 2021 अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार अर्ज शुल्काच्या स्वरूपात 160 रुपये भरावे लागणार आहेत. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं अर्ज शुल्क द्यावं लागणार नाही.
या भरतीसाठी उमेदवारांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या विषयांमध्ये 12 वी पास होणं आवश्यक आहे.
त्याशिवाय पश्चिम बंगाल पॅरा मेडिकल काऊन्सिलअंतर्गत येणाऱ्या राज्य मेडिकल फॅकल्टीद्वारे मान्यता प्राप्त मेडिकल टेक्नोलॉजी संबंधित विषयांत 2 वर्षीय डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
पश्चिम बंगाल सरकारद्वारे मान्यता प्राप्त संस्थान/ युनिव्हर्सिटीमधून मेडिकल टेक्नोलॉजी बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे.
मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये एक वर्षीय डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियांतर्गत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
संबंधित बातम्या
Wbhrb Medical Technologist Recruitment 2021 Sarkari Naukri Latest Updates Govt Job Medical Vacancy