आईला शिवीगाळ, आधी त्याने माफी मागायला लावली, ऐकलं नाही म्हणून थेट रक्तपात, एकाचा मृत्यू

आईवरुन शिवीगाळ केली म्हणून 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 11 वीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.

आईला शिवीगाळ, आधी त्याने माफी मागायला लावली, ऐकलं नाही म्हणून थेट रक्तपात, एकाचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : आईवरुन शिवीगाळ केली म्हणून 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 11 वीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. संबंधित घटना ही दिल्लीच्या ओखला भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही विद्यार्थी हे गव्हर्मेंट बॉईज सीनियर सेकेंडरी स्कूलचे विद्यार्थी आहेत.

पोटात चाकू खुपसून हत्या

आरोपी विद्यार्थ्याने शुक्रवारी (1 ऑक्टोबर) सकाळी मृतक विद्यार्थ्याला आईला शिवागाळ केल्याप्रकरणी आपल्या आईची माफी मागवी, असं सांगितलं होतं. पण मृतक मुलाने माफी मागण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरुन दहावीच्या विद्यार्थ्याने मृतक मुलाच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल

मृतक मुलाच्या पोटात चाकू खुपसल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. तो जमिनीवर पडून जोरजोरात ओरडत रडू लागला. त्यानंतर तिथे आजूबाजूला असलेले त्यांचे मित्र आणि परिसरातील नागरिक त्याच्याजवळ आले. जखमी मुलाने आपल्यासोबत काय झालं याची माहिती त्यांना दिली. तो प्रचंड जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलीस घटनास्थळी दाखल

या सर्व घडामोडींनंतर घटनास्थळावर असलेल्या काही नागरिकांनी पोलिसांना फोन करुन संबंधित घटनेची माहिती दिली. संबंधित ठिकाणी हिंसाचार होत असल्याची तुरळक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना नेमकं काय घडलं, याची स्पष्टपणे माहिती नव्हती. पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दोन लहान शाळकरी मुलांमध्ये वाद झाला अशी माहिती त्यांना मिळाली. पण नेमकी घटना काय झाली हे ऐकून घेतल्यानंतर ते देखील हैराण झाले.

जखमी विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू

पोलिसांनी आरोपी असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस तातडीने रुग्णालयाच्या दिशेला निघाले जिथे जखमी विद्यार्थ्याला दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर पोलिसांच्या हाती निराशाच लागली. कारण तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मृतक विद्यार्थ्याच्या कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावं

आपली पाल्य काय करतात, शाळेत कसे वागतात, त्यांचं कुणासोबत जमत नाही? या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. कारण कुमारवयात मुलांची डोकं जास्त गरम असतं. ते रागाच्या भरात काय करुन बसतील याचा अंदाज नसतो. त्यांच्यात संयम नसतो. बऱ्याच मुलांचा स्वभाव रागीटच असतो. कुणी नेहमीच नैराश्यात वावरतं. त्यामुळे आपल्याला पाल्याचं नेमकं दु:ख काय, त्यांचं म्हणणं काय, त्याचे आजूबाजू्चे मित्र-मैत्रिणींचे वातावरण कसे आहे, त्या वातावरणात त्याचं मूल्यशिक्षण कशाप्रकारे होतंय किंवा तो कशाप्रकारे घडतोय, या सगळ्यांकडे पालकांनी लांबून त्यांना समजणार नाही असं अंतर ठेवून बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. योग्यवेळी योग्य सल्ला देवून भांडण मिटवायला पाहिजे. तरंच या सारख्या घटना घडणार नाहीत.

हेही वाचा :

नवी मुंबईत अल्पवयीन दुचाकी चोरांचा सुळसुळाट, 20 बाईक्सची चोरी, दोघांना बेड्या, तिसरा फरार

अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून दिरंगाई, थेट नितीन गडकरींच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI