धक्कादायक! झारखंडमध्ये अल्पवयीन तरुणीवर तीन महिन्यात 30 वेळा बलात्कार

झारखंडमध्ये एका 15 वर्षीय तरुणीवर 30 वेळा बलात्कार करण्यात (Rape on Minor girl in jharkhand) आला. ही धक्कादायक घटना झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात घडली आहे.

धक्कादायक! झारखंडमध्ये अल्पवयीन तरुणीवर तीन महिन्यात 30 वेळा बलात्कार
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 2:52 PM

रांची : झारखंडमध्ये एका 15 वर्षीय तरुणीवर 30 वेळा बलात्कार करण्यात (Rape on Minor girl in jharkhand) आला. ही धक्कादायक घटना झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खूंटी जिल्हा प्रशासनाला पीडितेची काऊन्सलिंग करण्याचे आदेश दिले (Rape on Minor girl in jharkhand) आहेत.

“10 ते 12 मुलांनी तीन महिन्यात 25-30 वेळा माझ्यावर बलात्कार केला आहे”, असा आरोप पीडितेने केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या खुशबू खातूनने पीडितेला चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर उभे केले. त्यानंतर हा प्रकरा उघडकीस आला.

“पीडितेला घटनेची तारीख माहित नाही. पीडिता जेव्हा खूंटी बाजारात गेली होती. तेव्हा बगडूला राहणाऱ्या बजरंग नावाच्या मुलासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्याच्यासोबत त्याचा मित्र सूरजही होता. त्यानंतर दोघांनी बाईकवरुन सिंबुकेल गावात तिला घेऊन आले. त्यानंतर दोगांनी हडिया (एक नशेचा पदार्थ) पिले आणि माझा मोबाईल घेतला. त्यानंतर मला परत बाजारात आणून सोडले”, अशी माहिती चाईल्ड वेल्फेअर कमिटीने दिली.

पीडितेला आश्रम गृहात पाठवले

“पीडिता जेव्हा बजरंगला फोन करुन तिचा मोबाईल मागते. तेव्हा बजरंग तिला एका सुनसान जागेवर बोलवून तिच्यावर बलात्कार करतो. प्रत्येकवेळी त्याच्यासोबत वेगवेगळी मुलं असायची. विरोध केल्यावर तो जीवे मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार तीन महिने सुरु होता”, असा आरोप बजरंगवर आहे.

सामाजिक कार्यकर्त्या खुशबूच्या मदतीने पीडितेला आश्रम गृहात ठेवण्यात आले. या प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल (3 मार्च) ट्वीट करत खुशबू यांचे आभर व्यक्त केले.

“पीडित मुलीची मदत केल्याबद्दल तुमचे खूप आभार, योग्य ती कारवाई करुन पीडितेला मेडिकल, काऊन्सलिंग आणि न्यायालयीन मदत करा. तसेच खूंटी पोलिसांनी कठोर कारवाईसाठी फरार आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा शोध घ्या”, अशा सूचना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करत दिल्या आहेत.

प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात 

मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटला ट्वीट करत खूंटी जिल्हा प्रशासनाने म्हटले की, “मेडिकल आणि काऊन्सिलिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. सत्र न्यायालयाद्वारे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात सुनवाली जाणार आहे. त्यासोबत पीडितेला नुकसान भरभाईही देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.”

“बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींना 1 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच इतर आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरु आहे. एक ते दोन दिवसात सर्व आरोपींना पकडले जाईल. तसेच पीडितेची मेडिकल चाचणी करण्यात आली”, असं खूंटी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.